शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

‘ड्रीमगर्ल’ला फक्त ७० हजारांत भूखंड

By admin | Published: January 29, 2016 2:20 AM

बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार केंद्राला ओशिवरा येथील २००० चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ७० हजार रुपयांत बहाल केला जाणार आहे. उद्यानासाठी राखीव असलेल्या

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार केंद्राला ओशिवरा येथील २००० चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ७० हजार रुपयांत बहाल केला जाणार आहे. उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेसाठी प्रति चौरस मीटर ३५ रुपये आकारून त्याचे वितरण केले जाणार असल्याची धक्कादायक बाब, माहिती अधिकार कायद्याद्वारे समोर आली आहे.गलगली यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हेमा मालिनी यांच्या नाट्यसंस्थेस दिल्या जाणाऱ्या भूखंडाची माहिती मागितली होती. या माहितीमधून त्यांना अंधेरी तालुक्यातील मौजे आंबिवली येथील भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, २०१६ हे वर्ष सुरू असताना सरकारने त्यासाठी १ फेबु्रवारी १९७६ मधील मूल्यांकनाचा आधार घेतला आहे. त्या वेळी प्रति वर्गमीटर १४० रुपये दर होता, त्याच्या २५ टक्के म्हणजे फक्त ३५ रुपये इतका दर हा भूखंड देताना आकारण्यात येणार आहे. हेमा मालिनी यांना यापूर्वी ४ एप्रिल १९९७ मध्ये अंधेरी तालुक्यातील मौजे वर्सोवा येथील भूखंड तत्कालीन सरकारने दिला होता. त्यासाठी त्यांनी १० लाख रुपयांचा भरणा केला होता. मात्र, त्यातील काही भाग सीआरझेडमुळे बाधित होत असल्यामुळे, त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम केलेले नाही. तथापि, आता भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष करीत, हेमा मालिनीच्या संस्थेस पर्यायी भूखंड वितरित करण्याचे औदार्य दाखविले आहे. असा मिळाला भूखंडवर्सोवा येथील भूखंडाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी हेमा मालिनीच्या नाट्यविहार केंद्राने ६ जुलै २००७ मध्ये केली होती. आरक्षित क्षेत्रापैकी २ हजार वर्गमीटर जागा नाट्यकेंद्राला देऊन, उर्वरित जागेवर नियोजित उद्यानाचा विकास त्यांच्या संस्थेमार्फत करण्याची तयारी दर्शविली होती. राज्य सरकारने संस्थेसंबंधी मागितलेल्या काही मुद्द्यांची माहिती संस्थेने समाधानकारक दिलेली नसतानाही त्यांची मागणी मान्य करण्यात आली. मौजे आंबिवली, तालुका अंधेरी येथील सर्वे क्रमांक १०९/१ नगर भूमापन क्रमांक ३ पैकी क्षेत्र २९३६०.५० चौरस मीटर उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेपैकी, २ हजार चौरस मीटर जागा देण्याचे आदेश शासनाचे उपसचिव माधव काळे यांनी २३ डिसेंबर २०१५ रोजी दिले. महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबरला त्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर शासकीय चक्रे फिरली ७० हजारांत कोट्यवधीचा भूखंड हेमा मालिनीच्या नाट्यविहार केंद्रास बहाल करण्यास मंजुरी मिळाली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ जानेवारीला त्याबाबत हेमा मालिनी यांना पत्र पाठवून, पुन्हा काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना केली आहे. १८ आॅगस्ट २०१५ रोजी हेमा मालिनी या स्वत: भूखंडाच्या स्थळी उपस्थित होत्या, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)नियोजित वित्तीय खर्चाची पूर्तता नाहीचहेमा मालिनी यांच्या नाट्यविहार केंद्राने आतापर्यंत सांस्कृतिक संकुल प्रकल्पाच्या नियोजित खर्चाच्या २५ टक्के रक्कम उपलब्ध असल्याची हमी दिलेली नाही. त्यामुळे एकूण खर्चाच्या २५ टक्के एवढी रक्कम उपलब्ध असल्याचे २ महिन्यांत, तसेच ७५ टक्के रकमेची पूर्तता कशी करणार, याबाबत ठोस माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. केंद्राने सांस्कृतिक संकुल प्रकल्पाचा नियोजित खर्च १८ कोटी ४८ लाख ९४ हजार ५०० रुपये असून, संस्थेकडे सध्या साडेतीन कोटी निधी असल्याचे कळविले आहे. उर्वरित निधी बॅँकेकडून उभा करण्याचे नमूद केले आहे. त्यामुळे हा निधी प्रकल्प किमतीच्या २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि उर्वरित निधी कसा उभारणार? यात कोणतीही स्पष्टता नाही.असा मिळाला भूखंडयापूर्वी खासदार राजीव शुक्ला यांना मिळालेला भूखंड त्यांना परत करावा लागला होता. आता अभिनेत्री हेमा मालिनी यांना मिळालेल्या भूखंडावरून नवा गदारोळ निर्माण झाला आहे. हेमा मालिनी यांना हा भूखंड देताना सरकारने १ फेबु्रवारी १९७६ मधील मूल्यांकनाचा आधार घेतला आहे. त्यावेळी प्रति वर्गमीटर १४० रुपये दर होता, त्याच्या २५ टक्के म्हणजे फक्त ३५ रुपये इतका दर हा भूखंड देताना आकारण्यात येणार आहे.