ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.1 - जुन्या वैमनस्यातून गुंडांनी एका डेकोरेशन संचालकाचा खून केला. ही घटना अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील मरारटोली वस्ती रामनगर चौक येथे बुधवारी घडली. दीड महिन्यापूर्वी झालेल्या कुख्यात निलेश उर्फ बग्गा कौरती याच्या खुनाचा बदला घण्यासाठी हा खन झाल्याचे सांगितले जाते. दिवसाढवळ्या झालेल्या या खुनामुळे अंबाझरी परिसरात पुन्हा एकदा गँगवार
भडकल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. खुशाल कुहीके (३३) रा. तेलंगखेडी असे मृताचे नाव आहे.
बग्गा याचा १६ डिसेंबर रोजी मरार टोळीत खून करण्यात आला होता. बग्गाच्या खुनात बाबल्याला अटक करण्यात आली होती. सर्व आरोपी तुरुंगात आहेत. एकाच वस्तीत राहत असल्याने खुशालही आरोपींसोबत जुनी मैत्री आहे. खुशालचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. तो बग्गाच्या खुनाच्या आरोपींना न्यायालयात पेशी असतांना भेटायला जात होता. त्यामुळे बग्गाचा साथीदार पवन
शेरेकर खुप संतप्त होता. खुशाल आरोपीला जामीनावर सोडविण्यास मदत करीत आहे, असा त्याला संशय होता. त्याने बग्गाचे वडील आणि आपले साथीदार पलास चौधरी, अजय उर्फ चिडी मेश्राम संजू तभाने, जम्स यांना खुशालबाबद सांगितले. यानंतर सर्व जणांनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसापूर्वीच बग्गाचे वडील खुशालच्या घरी आले होते. तव्हा त्यांनी
खुशालला धड शिकवण्याची धमकी देऊन गेले होते. खुशालने याला फारसे गांभीर्याने घेतले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी १०.३० वाजत खुशाल शिव मंदिर येथून बुलेटने परतत होता. पवन शेरेकर, पलास चौदरी, अजय उर्फ चिटी मेश्राम, संजू तभाने आणि जेम्स आदींनी त्याचा पाठलाग केला. तो छोटा रामनगर चौकात पोहोचतास खुशालच्या डोक्यावर कुल्हाडीने वार केला. खुशाल बुलेटसह खाली पडला. जख्मी अवस्थेतही खुशालने स्वत:ला सांभाळले आणि जीव वाचवण्यासाठी वळू लागला. परंतु हल्लेखोरांनी पाठलाग करून पुन्हा त्याला पकडले. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोोकून त्याच्या शरीरावर श्सत्रांनी सपासप वार केले. त्याचा खून करून आरोपी फरार झाले. घटनेच्या वेळी छोटा रामनगर चौकात खुप गर्दी होती. पाहता-पाहताच परिसरातील दुकने बंदी झाली. घटनेची माहिती होताच अंबाझरी पोलीस तसेच खुशालचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळापासून थोड्या दूर अंतरावरच आरोपींची कुºहाड सापडली. झोन दोनचे डीसीपी कलसागर, ठाणेदार प्रसाद सबनीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ धरपकड मोहीम राबवित पवन शेरेकर, जेम्स सिंह उर्फ टकली, जयेश आत्राम आणि आकाश नेवारेला ताब्यात घेतले. पोलीस बग्गाच्या वडीलाचीही विचारपूस करीत आहे.
काही दिवसांपूर्वीपासून अंबाझरी पोलीस ठाणे परिसरात खुनाचे सत्र सुरू आहे. १६ डिसेंबरला बग्गाचा खून करण्यात आला होता. बग्गा गुन्हेगार सचिन सोमकुवरचा साथीदार होता. सचिनचाही चार महिन्यापूर्वी गोकुळपेठ बाजारात पोलीस चौकीसमोरच गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. सचिनच्या खुनात भाड्याचे गुन्हेगार वापरण्यात आले होते. परंतु या खुनाचा पत्ता लावण्यात
पोलिसांना यश आले नाही. सचिनचा खुन करणारे आरोपी सुद्धा जामीनावर बाहेर येण्याच्या तयारीत आहेत. ते बाहेर येताच अंबाझरी परिसरात पुन्हा गँगवार भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खुशालच्या खुनामुळे परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
-मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
खुशालच्या खुनामुळे दु:खी व संतप्त नातेवाईक तसेच त्याच्या समर्थकांनी धरमपेठ येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी घरासमोर निदेर्शने केली. पोलिसांच्या उदासिन भूमिकेमुळे गुन्हेगार निरंकुश झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. अचानक निदर्शने होत असल्याने सुरक्षेसाठी तैनात असलेले पेलीस कर्मचारीही हादरून गेले. त्यांनी मदतीसाठी अतिरिक्त पोलिसांना बोलावून घेतले. नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती दिली. पोलीस अधिकाºयांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन देऊन नागरिकांना
शांत केले. खुशालला ज्या पद्धतीने भर चौकात मारल्या गेले. त्यावरून गुन्हेगारांमध्ये पोलिसांनी अजिबात भिती राहिली नसल्याचे दिसून येते. खुशालच्या कुटुंबात आई, लहान भाऊ विकास, पत्नी जयश्री, दोन वर्षाची ममुलगी खुशी आणि चार वर्षाची लावण्या आहेत. तीन बहिणीचे लग्न झाले आहे. खुशाल वस्तीत सर्वांचाच आवडता हेता. आरोपींनी बग्गाचा खुनाच बदला घेण्यासोबतच आपली दहशत निर्माण करण्यासाठी खुशालचा खून केला. घटनेनंतर खुशालचे कुटुंबीय अंबाझरी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांच्या रडण्याने एकूणच वातावरण शोकाकुल झाले होते.