शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

अवयवदानाचा कोटींचा निधी रखडला

By admin | Published: April 20, 2016 2:42 AM

केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या आरोग्य संचालनालयाला निधी दिला जातो. राज्याच्या आरोग्य संचालनालयाने २०१३ पासून ४३ कोटी रुपयांचा हिशेब केंद्र सरकारला सादर

मुंबई : केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या आरोग्य संचालनालयाला निधी दिला जातो. राज्याच्या आरोग्य संचालनालयाने २०१३ पासून ४३ कोटी रुपयांचा हिशेब केंद्र सरकारला सादर न केल्याने, अवयवदानाला मंजूर झालेला ५ कोटींचा निधीही अडकून पडला आहे. त्यामुळे अवयवदानात मोहिमेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मुंबईसह राज्यात दोन वर्षांत अवयवदान चळवळीला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, पण आर्थिक साहाय्य मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र सरकारने राज्यातील ३२ नर्सिंग महाविद्यालयांसाठी २०१३ मध्ये ४३ कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातील काही रक्कम नर्सिंगच्या साहाय्यक संचालकांनी वापरली आहे. काही रक्कम अजूनही वापरलेली नाही, पण वापरलेल्या रकमेचा हिशेब केंद्र सरकारला अजूनही सादर केलेला नाही. नर्सिंगच्या एका साहाय्यक संचालकाने हा हिशेब सादर करावा, असे पत्र केंद्र सरकारने पाठवले आहे. अद्याप त्यांना हिशेब सादर झाला नसल्याने, निधी यंदाही अडकून पडणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात अवयवदानासाठी ८० लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता, पण तो न मिळाल्याने हा निधी रद्द झाला आहे. निधी देऊनही का वापरला जात नाही, अशी विचारणा करणारे पत्र मार्च महिन्यात केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या प्रधान सचिवांना पाठवले आहे. नर्सिंगला दिलेल्या रकमेचा हिशेब सादर न केल्यास अवयवदानाचा निधी मिळणार नाही, असे त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे, तरीही या रकमेचा हिशेब राज्याने केंद्र सरकारला पाठवला नाही. (प्रतिनिधी)