शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

प्रवेशाच्या नावाखाली लूट

By admin | Published: August 28, 2015 1:24 AM

लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली हैदराबादच्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला २५ लाखांना

अहमदनगर : लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली हैदराबादच्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला २५ लाखांना लुबाडल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी ४ जणांच्या टोळीविरुद्ध लोणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयांचे नाव वापरून फसविणारे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हैदराबाद येथील एम. विजय भास्कर रेड्डी यांनी ‘लोकमत’कडे त्यांची कैफियत मांडली. प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांची २५ लाखांना फसवणूक झाली आहे.१७ आॅगस्टला त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. मुलीच्या वैद्यकीय प्रवेशाच्या गडबडीत असताना २९ जुलैला रेड्डी यांना एक एसएमएस आला होता. सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातील मोजक्या जागा शिल्लक आहेत, असे त्यात म्हटले होते. रेड्डी यांनी ३० जुलैला संबंधित मोबाइलवर संपर्क साधला. दोन दिवसांनी सौरभ नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मुलीचा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगितले. सौैरभने त्यांना प्रवरा मेडिकल महाविद्यालयात बोलाविले. ८ जुलैला सौरभने शैक्षणिक शुल्कापोटी रेड्डी यांना ५ लाख ४५ हजारांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यास सांगितले. सोबतच व्यवस्थापनाला २५ लाख रोख द्यावे लागतील, असा निरोप दिला. रेड्डी पुन्हा लोणी येथे आल्यानंतर सौरभने त्यांची आर.व्ही. पाटील यांच्याशी भेट घालून दिली व ते प्रवरा ट्रस्टचे सचिव असल्याचा दावा केला. १४ आॅगस्टला पाटीलने रेड्डी यांना वैद्यकीय प्रवेशपत्र सोपविले आणि त्यांच्याकडून रोख २५ लाख रुपये घेतले. मात्र १७ आॅगस्टला रेड्डी यांनी महाविद्यालयात प्रवेशाचे पत्र दाखविल्यानंतर ते बनावट असल्याचे उघड झाले. रेड्डी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)माझी कैफियत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कानावर घातली आहे. स्थानिक पोलिसांना आरोपींची सीसीटीव्हीतील छायाचित्रे, मोबाइल क्रमांक दिले आहेत. मात्र मोबाइल बंद झाले आहेत.- एम. विजय भास्कर रेड्डी, तक्रारदार, हैदराबादरेड्डी मला भेटले होते. त्यांची फसवणूक झाली आहे. प्रवेश प्रक्रियेची पूर्ण माहिती त्यांनी घेतली असती तर हे टळले असते. महाविद्यालय व्यवस्थापनाचा आरोपींशी संबंध नाही. - प्राचार्य डी.एस. कुलकर्णी, प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय, लोणीरेड्डी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांनी हैदराबादला गुन्हा दाखल करू, असे सांगितले होते. - विनोद पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, लोणी