अलिबाग : शिक्षकदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शनद्वारे रायगड जिल्हय़ातील 3 हजार 756 शाळांतील तब्बल 4 लाख 69 हजार 876 विद्याथ्र्याशी संवाद साधणार असल्याची माहिती रायगड जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
दुपारी 3 ते 4.45 यावेळेत देशातील सर्व शालेय विद्याथ्र्याशी दूरदर्शनच्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधतील. या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या 2 हजार 838 प्राथमिक, जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या 78 प्राथमिक व 9 माध्यमिक, खाजगी प्राथमिक 263 व माध्यमिक 542 तर 15 शासकीय व 11 खाजगी आश्रमशाळांमधील या विद्याथ्र्याना पंतप्रधानांचे भाषण ऐकता येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
टीव्ही संचासाठी शिक्षकांची धडपड
पोलादपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 5 सप्टेंबर रोजी शालेय विद्याथ्र्याशी सुसंवाद साधण्यासाठी होणारे भाषण विद्याथ्र्याना ऐकविण्यासाठी टीव्ही संच अथवा रेडिओ या साधनांची उपलब्धता करण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरु झाली असून याकामी जि. प. शिक्षण विभागाकडून जोरदार नियोजन सुरू केले आहे. या पाश्र्वभूमीवर पोलादपूर पं. स. शिक्षण विभागाकडून नियोजन सुरू आहे. ऐन गणोशोत्सव काळात शिक्षक, विद्यार्थी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच, शिक्षण विभागाचे अधिकारी/कर्मचारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामाला लागले असले तरी मात्र दुर्गम डोंगराळ भागातील शाळांवर टीव्ही संच उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.