शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

PM Kisan Scheme : दोन लाख अपात्र शेतकऱ्यांकडून १९३ कोटी रुपये वसूल करणार, राज्यातील २८ जिल्ह्यांतील स्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 1:15 AM

PM Kisan Scheme: राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ७९ हजार ९८ बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३१ हजार बोगस लाभार्थी आहेत.

मुंबई : केंद्र सरकारने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेअंतर्गत राज्यातील २८ जिल्ह्यांत २ लाख ५१ हजार ९८२ शेतकरी ‘लोकमत’ने राज्यभर केलेल्या पाहणीत अपात्र आढळले आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यांची चौकशी सुरू झाली असून त्यांच्याकडून तब्बल १९३ कोटी ६६ लाख रूपये वसूल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे नावावर जमीन नसलेल्यांपासून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे ‘लोकमत’च्या ग्राऊंड रिपोर्टमध्ये आढळले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ७९ हजार ९८ बोगस लाभार्थी आढळले असून त्यांच्याकडून तब्बल ५१ कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ३१ हजार बोगस लाभार्थी आहेत. विदर्भात ५२ हजार, पश्चिम महाराष्ट्रात ७९ हजार तर उत्तर महाराष्ट्रात ३९ हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. 

काय आहेत योजनेचे निकष?दोन हेक्टरपर्यंत लागवडीलायक क्षेत्र असलेल्या शेतकरी कुटुंबास प्रति हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये असा लाभ देण्यात येतो. राज्यात डिसेंबर २०१८ फेब्रुवारी २०१९ पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली. दर चार महिन्याला हे पैसे खात्यात जमा होतात. 

वसुलीबरोबर फौजदारी गुन्हाही अर्जात चुकीची माहिती दिली असल्यास फौजदारी गुन्ह्यास पात्र राहीन, असे संबंधित शेतकऱ्याकडून लिहून घेतलेले आहे. त्यामुळे रक्कम वसूल करण्याबरोबरच संबंधितावर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. 

महा-ई सेवा केंद्रांवर कारवाईयोजनेसाठी काम करणाऱ्या व माहिती घेण्यात हलगर्जी करणाऱ्या महा- ई सेवा केंद्रांवर कारवाई सुरू झाली आहे. 

कोण आहेत बोगस लाभार्थी?n नावावर जमीन नसलेल्यांपासून गलेलठ्ठ पगार घेणारे सरकारी अधिकारी बोगस लाभार्थी आढळले आहेत. दहा हजार रुपयांच्यावर निवृत्ती वेतन घेणारेही बोगस लाभार्थी आहेत. n काहींकडे दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे, मात्र तेही लाभार्थी आढळले आहेत. अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी झाल्याने गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. 

विदर्भजिल्हा        बोगस      रक्कम     लाभार्थी    वसूल करणारअकोला          ७,१०४     ४­.८९ कोटी भंडारा           ३,२१३    २.६६ कोटी चंद्रपूर           ३,४६५    ३.४४ कोटी गडचिरोली      ९१०          ८३.३४ लाख   यवतमाळ       १५,०००    ३ कोटी गोंदिया           ३,१७१    ३.५७ कोटी वाशिम           १,७२९    १.५४ कोटी वर्धा    ४,३६६    ३.७८ कोटी बुलडाणा    ५,९८६    ५.३३ कोटी अमरावती        ७,६०३    ५.८८ कोटी 

प. महाराष्ट्रजिल्हा        बोगस      रक्कम     लाभार्थी    वसूल करणारपुणे    १६,११८    १४.०७  कोटी कोल्हापूर    १३,४३७    १३.२६  कोटी सांगली        १४, २६७    ११.३५  कोटी सातारा        १९,०६६    ११.४३  कोटी सोलापूर      १६,२१०    १५.१६  कोटी 

उत्तर महाराष्ट्रजिल्हा        बोगस      रक्कम     लाभार्थी    वसूल करणारनाशिक        ११,८५४    ११.१० काेटीनगर    २७,९६३      २२ कोटीधुळे            ७,७२७       ७ काेटीजळगाव       १३,१७२      १२.४८ काेटीनंदुरबार       १,७४६        १.७१ काेटी

मराठवाडाजिल्हा        बोगस      रक्कम     लाभार्थी    वसूल करणारऔरंगाबाद    ७,५१६    ७.९ कोटी नांदेड    ९,९८५    ७.४३ कोटी बीड    ३१,६६९    १४.२७ कोटी लातूर    ८,५५१    ८ कोटीपरभणी    ४,६७७    ४.२४ कोटी जालना    ५१२२    ४.७५  कोटी उस्मानाबाद    अपात्र नाही    -

कोकणजिल्हा        बोगस      रक्कम     लाभार्थी    वसूल करणाररत्नागिरी      ५,६००      २.११ काेटी

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाMaharashtraमहाराष्ट्रagricultureशेतीFarmerशेतकरी