मुंबई : चार वाहतूक प्रकल्पांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बार उडवून देण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची सध्या धावाधाव सुरु आहे. या प्रकल्पांचे भूमिपूजन २४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते वांद्रे पूर्वेकडील एमएमआरडीएच्या मैदानात एकत्रितरित्या करण्यात येणार आहे. २३.५ किलोमीटर लांबीच्या डी.एन. नगर-मानखुर्द मेट्रो-२ ब आणि ३२ किलोमीटर लांबीच्या वडाळा-कासारवडवली मेट्रो-४ या दोन प्रकल्पांना शासनाने मान्यता दिली आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प हा प्रकल्प प्राधिकरणामार्फत राबवला जाणार आहे. वांद्रे पूर्वेकडील कलानगर येथे सागरी सेतूच्या दिशेने जाण्या-येण्यासाठी प्राधिकरणातर्फे फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहे. कुर्ला-वाकोला उन्नत मार्गामुळे सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. . (प्रतिनिधी)
पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्प शुभारंभासाठी धावाधाव
By admin | Published: December 23, 2016 5:08 AM