शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

PM Modi In Pune: 'रविवारी कोणती शाळा असते ओ मोदी साहेब', पुणे दौऱ्यात मोदींच्या मेट्रो प्रवासावर काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 4:15 PM

PM Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात विविध कामांचं लोकार्पण झालं. यावेळी पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचं उदघाटन केलं आणि मेट्रोतून प्रवासाचाही अनुभव घेतला.

PM Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात विविध कामांचं लोकार्पण झालं. यावेळी पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचं उदघाटन केलं आणि मेट्रोतून प्रवासाचाही अनुभव घेतला. पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर मोदींनी गरवारे कॉलेज ते आनंदनगर असा प्रवास केला. मेट्रो प्रवासत मोदींनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पण मोदींच्या याच कृतीवर आता काँग्रेसनं टीका केली आहे. 

मोदींनी मेट्रो प्रवासात शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला खरा पण आज रविवार असतानाही ही मुलं शाळेत का जात आहेत?, असा सवाल उपस्थित केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुनही मोदींच्या या कृतीबाबत सवाल उपस्थित कऱण्यात आला आहे. "रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास देत आहात?", असं सवाल करत काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

मोदींनी विद्यार्थ्यांसोबत साधला संवादमोदींनी मेट्रो प्रवासात शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांना विविध प्रश्न विचारले. यात मोदींनी या शालेय विद्यार्थ्यांना नेमकं काय विचारलं याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची भेट घेऊन तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे? तुमची काय इच्छा आहे? तुम्ही कोणत्या शाळेत शिकता आणि आमची नावं विचारली", असं मोदींशी संवाद साधलेल्या विद्यार्थिनीनं म्हटलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPuneपुणेcongressकाँग्रेस