शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 3:51 PM

राष्ट्रवादीच्या दोन ज्येष्ठ खासदारांमध्ये मंत्रिपदावरून वाद असल्याचाही रंगल्यात राजकीय वर्तुळात चर्चा

Devendra Fadnavis NCP, PM Modi oath taking NDA Government:  गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका संपल्या, त्यानंतर ४ जूनला निकालही हात आले. त्यात भाजपप्रणित NDA ला बहुमत मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन टर्ममध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता मिळाली होती, पण यावेळी त्यांना मित्रपक्षांच्या साथीने सरकार चालवावे लागणार आहे. त्यामुळे NDA तील घटक पक्षांशी समन्वय साधूनच गोष्टी घडत आहेत. मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील पंतप्रधानपदाचा शपथविधी आज दिल्लीत होणार आहे. त्यात महाराष्ट्रातून भाजपाचे ५ आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक अशा ६ खासदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र एकही खासदाराला आज मंत्रिपदाची शपथ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्ट शब्दांत माहिती दिली.

"राष्ट्रवादीला सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्रिपद-स्वतंत्र प्रभार अशी ती जागा होती. पण त्यांचा आग्रह असा होता की राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित आहे आणि ते याआधी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे राज्यमंत्री-स्वतंत्र प्रभार करता येणार नाही. पण जेव्हा युतीचे सरकार असते तेव्हा काही निकष तयार केलेले असतात. एका पक्षाकरता ते निकष बदलता येत नाहीत. त्यामुळे मला विश्वास आहे की जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्यांचा विचार नक्की केला जाईल," असे फडणवीसांनी स्पष्ट सांगितले.

"आताही आमच्याकडून समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यांनीच सांगितले की यावेळी शक्य नसल्यास पुढच्या वेळी द्या, पण आम्हाला राज्यमंत्रिपदाऐवजी मंत्रिपद द्या," अशी माहितीदेखील फडणवीस यांनी दिली. "महाराष्ट्रातून काही अनुभवी आणि काही युवा खासदारांना मोदींच्या NDA सरकारमध्ये संधी मिळाली आहे. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांसह शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सर्व जण मंत्रिमंडळात येत आहेत याबद्दल मला आनंद आहे. या सर्वांचे अभिनंदनही करतो," असेही फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरे-प्रफुल पटेल यांच्यात वाद असल्याची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सध्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ४ पैकी केवळ १ खासदार निवडून आणता आला. त्यामुळेच अजितदादा गटात राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल आणि लोकसभेचे खासदार सुनील तटकरे अशा दोन खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री कोण होणार यावरून वाद झाल्याचे काही सुत्रांनी सांगितले. दोघांनाही केंद्रात मंत्रिपद हवे असल्याने तटकरेंच्या दिल्लीतील बंगल्यावर यांच्यात चर्चा झाली. पण त्यावर तोडगा न निघाल्यानेच भाजपाकडून ऑफर मिळूनही या शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या खासदाराला मंत्र्यांच्या अंतिम यादीत स्थान मिळाले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचाच फटका त्यांना बसला असल्याचेही बोलले जात आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेलsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी