शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

पंतप्रधानांना घालणार ५००० बोटींचा घेराव

By admin | Published: March 02, 2016 3:26 AM

शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न शिवस्मारक समितीकडून सुरू आहे

मुंबई : शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न शिवस्मारक समितीकडून सुरू आहे. मात्र कफ परेड येथील जागेवर पंतप्रधानांनी भूमिपूजनाचा प्रयत्न केल्यास ५ हजार यांत्रिक बोटींनी घेराव घालण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला आहे.समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल म्हणाले की, शिवस्मारकाला मच्छीमारांचा विरोध नसून कफ परेड येथील जागेवर स्मारक उभारण्यास विरोध आहे. स्मारक उभारणीसाठी सरकारसमोर हाजीअली समुद्रकिनारा, महालक्ष्मी रेसकोर्स आणि बँडस्टँड व कार्टर रोड येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्यांचा पर्याय आहे. मात्र स्मारक उभारणीसाठी लागणाऱ्या २० हजार कोटींमधील वाट्यासाठी कफ परेड येथील समुद्रकिनाऱ्यावरच स्मारक उभारण्याचा अट्टाहास सुरू असल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे. याउलट कार्टर रोड येथील खडकाळ भागात अवघ्या २०० कोटींमध्ये स्मारक उभे करता येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. कृत्रिम बेट उभारल्यास येथील २० हजारांहून अधिक मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. शिवाय येथील समुद्रजीव नष्ट होणार असून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचाही ऱ्हास होण्याची शक्यता तांडेल यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील १६ सामाजिक संघटनांनी अरबी समुद्रात प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शवला आहे. सरकारने शिवस्मारकाची जागा न बदलल्यास हरित आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा तांडेल यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)