कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ कवी राघवेंद्र माधव मंगसुळीकर तथा राजा मंगसुळीकर (वय ७४) यांचे शनिवारी पहाटे ३.३० वाजता कऱ्हाड येथे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील मूळचे रहिवासी असणाऱ्या राजाभाऊंनी प्राथमिक शिक्षण साखरवाडी व माध्यमिक शिक्षण फलटण येथे पूर्ण केले. त्यानंतर उगार शुगर येथे प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी म्हणून २६ वर्षे प्रदीर्घ नोकरी केली. शीघ्र कवी, साहित्यिक, गायक, वादक, अभिनेता, दिग्दर्शक, लेखक असे विविध पैलू त्यांच्या अंगी होते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण चीनच्या आक्रमणावेळी देशाचे संरक्षणमंत्री झाले. त्यावर आधारित ‘हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ हे त्यांनी लिहिलेले काव्य राज्याच्या कोनाकोपऱ्यात पोहोचले. पी. डी. पाटील प्रतिष्ठानचा ‘कऱ्हाड गौरव पुरस्कारासह अन्य पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. (प्रतिनिधी)
कवी राजा मंगसुळीकर यांचे निधन
By admin | Published: October 09, 2016 2:03 AM