शिरपूर (जि. धुळे) : शिंगावे येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील १६ मुलींना अन्नातून विषबाधा झाली़ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात या मुलींवर उपचार सुरू आहेत. कस्तुरबा वसतिगृहात ५४ मुली होत्या़ रात्रीच्या भोजनानंतर १६ मुलींना उलट्या व जुलाब असा त्रास होऊ लागला़ त्यामुळे त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुली इयत्ता दहावी ते एम़ए़पर्यंत शिक्षण घेत असून, १५ मुली नंदुरबार जिल्ह्यातील तर एक मुलगी शिरपूर तालुक्यातील आहे़
धुळ्यात १६ मुलींना विषबाधा
By admin | Published: January 11, 2015 1:50 AM