शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

पोकेमॉन गो - वास्तव जगतातील आभासी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2016 12:32 AM

फक्त एका आठवड्यापूर्वी आलेल्या पोकेमॉन गो या आॅगमेंटेड रिएलिटी गेमने जगभरात अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. या मोबाईल गेमने लोकांना इतकं वेड लावलं आहे की तो खेळण्यासाठी

- कुणाल गडहिरे फक्त एका आठवड्यापूर्वी आलेल्या पोकेमॉन गो या आॅगमेंटेड रिएलिटी गेमने जगभरात अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. या मोबाईल गेमने लोकांना इतकं वेड लावलं आहे की तो खेळण्यासाठी काहींनी त्यांच्या नोकऱ्या सोडल्याच्या घटना अमेरिकेत घडल्या आहे. फक्त आठवड्याभरात या गेमने ट्विटरसारख्या मोठ्या सोशल नेटवर्किंग साईट वापरणाऱ्यांच्या संख्येत मागे टाकले आहे. आणि विशेष म्हणजे जाहिरातीवर काहीच खर्च केलेला नाही. स्मार्टफोनमुळे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आणि गेममध्ये अडकून राहिल्याने घराबाहेर न पडणारी मंडळी पोकेमॉन गो गेमच्या वेडापायी अख्खं शहर पिंजून काढत आहेत आणि नवीन लोकांना भेटत आहेत. आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजेच एक प्रकारे आभासी विश्व आणि वास्तव जग यांचा मेळ घडवून आणणारी नवीन संकल्पना. या आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी संकल्पनेच्या माध्यमातून भविष्यात टेक्नॉलॉजी क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल आणि शोध हे अपेक्षितच होते. अनेक स्टार्ट अप्स या विषयात काम करत आहे. मात्र याचा थेट लोकांच्या आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो आणि दैनंदिन आयुष्यात त्याचा कशा प्रकारे प्रत्यक्षात वापर होऊ शकतो याचं थेट प्रात्यक्षिक हे पहिल्यांदाच इतक्या व्यापक स्वरूपात पोकेमॉन गो या गेमच्या लोकप्रियतेमुळे अधोरेखित झाले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित नीअँटिक या गेमिंग कंपनीने लहान मुलांच्या विश्वातील लोकप्रिय कार्टून मालिकेतील पोकेमॉन या कार्टून कॅरेक्टरला केंद्रस्थानी ठेवून हा गेम तयार केला आहे. हा गेम खेळण्यासाठी आपल्या मोबाइलमधील जीपीएस या तंत्राचा वापर अनिवार्य आहे. जीपीएस यंत्रणा चालू करून हा गेम खेळण्यास सुरुवात करण्यासाठी वापरात असलेला मोबाइल हा हातात घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष स्वत:हून वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागते. ही भटकंती चालू असताना तुम्ही प्रत्यक्ष जगात म्हणजेच तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी सध्या कुठे आहात हे या गेममध्ये तपासले जाते आणि हा गेम खेळताना तुमच्या मोबाइलवर ते तुम्हाला जीपीएसच्या माध्यमातून नकाशावर दाखवले जाते. आत्ता हा गेम तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या आसपास आभासी जगतात तुमच्या मोबाइलवरील नकाशात त्या ठिकाणी पोकेमॉन कुठे लपले आहेत ते तुम्हाला दाखवते; आणि तुम्हाला त्या पोकेमॉनला पोकबॉल या एक चेंडूप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टीला पोकेमॉनकडे फेकून पोकेमॉनला तुमच्या जाळ्यात पकडावे लागते. या गेमची संरचना अशा प्रकारे केली असल्याने हा गेम एका ठिकाणी किंवा एका विशिष्ट जागेच्या परिघात बसून खेळणे अशक्य आहे. त्यामुळे हा गेम खेळण्यासाठी प्रत्यक्ष घराबाहेर पडणे हे भाग पडते आणि जास्तीतजास्त पोकेमॉन पकडण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावे लागते. दुसरी बाब अशी की हा गेम एकट्याने जरी खेळावा लागत असला तरी तो खेळणारे इतर लोक हे तुमच्यासोबत स्पर्धा करतात. त्यामुळे सध्या अमेरिकेसहित अनेक देशांत एकाच ठिकाणी अनेकांची एका पोकेमॉनला पकडण्यासाठी आपोआपच गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. आणि याच वैशिष्ट्यामुळे या गेमच्या माध्यमातून लोकांना घराबाहेर काढून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला भाग पडणे आणि इतर लोकांशी थेट भेटणे आणि त्यांच्याशी संवाद करणे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. हा गेम खेळणाऱ्या अनेकांनी त्यांचे अनुभव सध्या फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर लिहिले आहेत. कित्येकांनी त्यांना फक्त चोवीस तासांत १००हून अधिक नवीन मित्र मिळाल्याचे सांगितले आहे. तर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारामुळे हा गेम खेळता येत नसल्याबद्दल जाहीर खंत व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीतील सर्वांत प्रमुख दावेदार मानल्या जाणाऱ्या हिलरी क्लिंटन यांनी तर या गेममधील पोकेमॉन सापडणारी ठिकाणे आणि गेममधीलच आभासी जिम आणि पोकस्टोप (गेम खेळणाऱ्यांसाठी असलेल्या आभासी व्यायामशाळा आणि एक प्रकारची दुकाने ज्यांचं वास्तव जगतात अस्तित्व आहे ) यांचा वापर करत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करायला आणि निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. पोकेमॉन गो हा गेम सध्या जगभरातील ११ देशांमध्ये अधिकृतरीत्या डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. मात्र असे असतानाही इतर देशांमध्येसुद्धा एपीके फाइल्सच्या माध्यमातून तो मोबाइलवर डाउनलोड करून खेळण्यात येत आहे. हा प्रतिसाद इतका जास्त आहे की त्यामुळे कंपनी वापरत असलेले सर्व्हर वारंवार बंद पडत आहे. मात्र तिथल्या रस्त्यांवरती लोक रात्री उशिरापर्यंत जागून हा खेळ खेळताना दिसत आहेत; आणि यामुळे अमेरिकेसारख्या देशात तिथल्या पोलीस यंत्रणेवरसुद्धा ताण येत आहे. या खेळामुळे भविष्यातील गेम्स, वेगवेगळे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, टेक्नोप्रोडक्ट्स हे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गरजा आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या माध्यमातून मनोरंजनात्मक पद्धतीने पूर्ण करण्यासोबतच विविध नव्या संकल्पनांना जन्म घालणार हे अधोरेखित झाले आहे. - ६ जुलै रोजी गेम अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या देशांत रीलीज करण्यात आला - एका आठवड्यात आत्तापर्यंत दीड कोटीहून अधिक वापरकर्ते - हिलरी क्लिंटन यांच्याकडून निवडणूक प्रचारासाठी अधिकृत वापर - हा गेम बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करण्यास जगभरातील मोठे गुंतवणूकदार उत्सुक - ट्विटर, फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट या कंपन्यांना दररोज वापरकर्त्याच्या संख्येत मागे टाकले - आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी प्रकाराला नवीन मार्गदर्शक दिशा देणारा गेम - सोशल नेटवर्किंगमुळे घराबाहेर न पडणारे गेम खेळण्यासाठी घराबाहेर - वास्तवातील आणि भविष्यातील सोशल नेटवर्किंग संसाधन म्हणून तज्ज्ञांची आणि प्रसारमाध्यमांची नजर