शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पोलिसांच्या चुकीमुळे आरोपी झाला पसार

By admin | Published: September 11, 2016 3:54 AM

पोलिसांच्या एका चुकीमुळे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा इम्रान खान हा आरोपी पसार झाल्याची घटना कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे

ठाणे : पोलिसांच्या एका चुकीमुळे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारा इम्रान खान हा आरोपी पसार झाल्याची घटना कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. कळवा पोलिसांनी गुरुवारी रात्री इम्रानला चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र पीडित मुलगी भिवंडी बाल सुधारगृहात असल्याने तिला रात्रीच्या वेळेस ओळख पटविण्यासाठी पोलीस ठाण्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे हीच संधी साधून सकाळी पुन्हा चौकशीसाठी येतो, आता सोडा, अशी विनंती त्याच्या भावाने पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्याला सोडले आणि त्यानंतर मात्र तो पसार झाला. परंतु या बाबत पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला. कळव्यातील भास्कर नगर भागात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इम्रानची मुलीशी ओळख झाली होती. यातून त्याने लग्नाचे आमिष दाखवले. याची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने तिला उत्तरप्रदेशात नातेवाईकाकडे पाठविले होते. परंतु, तिच्या शोधात तो तिच्या गावी पोहचला. तिला पळवून नेले. त्यानंतर उत्तरप्रदेशातील एका मित्राच्या घरी नेऊन तिथे त्याने २२ दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला नालासोपारातील घरी आणले. तिथेही तिच्यावर अत्याचार केला. याच घरात त्याने तिला कोंडून ठेवले होते. २७ आॅगस्ट रोजी तिने स्वत:ची सुटका केली व कळवा पोलीस ठाणे गाठले. तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे बेपत्ता झालेली मुलगी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलीसही चक्र ावले. तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)