अहमदनगर: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारु अड्डय़ांवर पोलिसांनी छापा घातला. जिल्ह्यात ९0 अड्डय़ांवर छापे घालून लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्वाधिक अवैध दारु अड्डय़ांवरील कारवाई श्रीगोंदा विभागात झाली आहे. त्याखालोखाल श्रीरामपूर, शिर्डी आणि कर्जत उपविभागांचा समावेश आहे. अवैध दारु विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणे, तयार करणारी अड्डे पोलिसांनी लक्ष्य केली होती. अवैध दारु विक्रीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. प्रचार संपल्यानंतर गावोगावी पोलिसांची खास पथके गस्त घालणार आहेत.(प्रतिनिधी)