शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

नवीन वर्षात उघड्यावर शौचास गेल्यास पोलीस कारवाई

By admin | Published: December 25, 2016 2:47 AM

केंद्र शासनाची राज्य सरकारला कडक कारवाई करण्याची सूचना!

सदानंद सिरसाटअकोला, दि. २४- मार्च २0१८ अखेरपर्यंत राज्य हगणदरीमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. त्यासाठी १ जानेवारी २0१७ पासून उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर पोलीस विभागाने कारवाई करण्याचे निर्देश केंद्र शासनाने राज्याला दिले आहेत. त्यामुळे आता नवीन वर्षात उघड्यावर शौचास बसणार्‍यांनी थेट पोलीस कारवाईलाच सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हय़ात कुटुंब सर्वेक्षण अभियान २0१२ मध्ये राबविण्यात आले. त्यानुसार जिल्हय़ातील हजारो कुटुंब अद्यापही उघड्यावर शौचास जातात. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे, शौचालयाच्या बांधकामासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. तरीही वैयक्तिक शौचालय वापरण्याबाबत ग्रामस्थांमध्ये उदासीनता असल्याचे शासनाच्या वारंवार निदर्शनास आले आहे. आता पोलीस कारवाई करूनच ग्रामस्थांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न शासनाकडून होणार आहे. मार्च २0१८ अखेर राज्य हगणदरीमुक्तमहाराष्ट्र राज्य येत्या मार्च २0१८ अखेरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात असलेल्या शासनाच्या सर्व यंत्रणांचे सहकार्य घेण्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता हा उपक्रम जोरात सुरू होण्याची शक्यता आहे.प्रधानमंत्री मोदींचे पोलीस कारवाईचे निर्देश राज्यातील एका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तेथील पोलीस अधीक्षकांना उघड्यावर शौचास जाणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री यांनी १ जानेवारी २0१७ पासून उघड्यावर शौच करणार्‍यांवर पोलीस कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा संदर्भ आहे. मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाईशौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौच करणार्‍या ग्रामस्थांवर मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ११५, ११७ नुसार कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत; मात्र पोलीस विभागाकडून ही कारवाई केलीच जात नाही. त्याच वेळी जिल्हा परिषदेच्या पथकासोबत हमरी तुमरीच्या घटनाही वाढलेल्या आहेत. पोलीस लक्ष देत नाहीत, जिल्हा परिषदेच्या पथकाला ग्रामस्थ जुमानत नाहीत, ही परिस्थिती आहे.अनुदान न घेणार्‍यांचे करायचे काय..?दरम्यान, ज्या ग्रामस्थांनी शौचालयासाठी शासकीय अनुदान घेतले नाही किंवा स्वखर्चाने ते बांधले, त्यांनी विरोध केल्यास पोलीस कारवाई कशी करावी, असा प्रश्न पोलिसांचा आहे. त्यामुळे अधिनियमातील कारवाईपेक्षा गुड मॉर्निंग पथकासोबत पोलीस देण्याचा पर्याय हा विभाग स्वीकारण्याची शक्यता आहे.