शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

जळगावात पोलीस आणि आरोपीत फायरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2016 6:00 PM

पुणे, नगर जिल्ह्यात अनेक घरफोड्या, बँक लूट गुन्ह्यामधील मधील वर्षभरापासूनचा फरार असलेला व सध्या चाळीसगाव शहरात वास्तव्यास असलेल्या आरोपीला

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि.01 - पुणे, नगर जिल्ह्यात अनेक घरफोड्या, बँक लूट गुन्ह्यामधील मधील वर्षभरापासूनचा फरार असलेला व सध्या चाळीसगाव शहरात वास्तव्यास असलेल्या आरोपीला पोलिसांनी येथे पकडले.यावेळी त्याची पुणे येथील पोलीसांची चकमक झाली. आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांवर गोळीबार केला. तर पोलिसांनीही त्याच्यावर गोळी झाडली असता त्याच्या पायाला लागून तो जखमी झाला व पोलिसांच्या तावडीत सापडला. ही घटना १ रोजी सकाळी ७ वाजता घडली.आरोपीचे नाव सचिन अप्पा इथापे (वय २६, रा.कोंडेगव्हाण ता.पारनेर जि.अहमदनगर) असे असून पुणे नगर, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या घरफोड्या, बँक लूट, रस्तालुटीत तो आरोपी आहे. गेल्या एक-दीड वर्षापासून तो फरार होता. चाळीसगाव येथील धुळे रोडवरील पुन्शी पेट्रोल पंपा मागील माधवनगरात प्लॉट नं.८५ मध्ये त्याने घर बांधले होते. साधारणत: एक-दीड वर्षापासून त्याचे येथे वास्तव्य होते. घरात आई व पत्नी राहात असे.अनेक गुन्हे त्याने केल्यामुळे पुणे एलसीबी पोलीस त्याच्या मागावर होते. गुप्त माहिती मिळताच पुणेएलसीबी पथकातील पोउनि अंकुश माने व इतरांनी मंगळवारी सकाळी ७ वाजता त्याच्या घराजवळ सापळा लावला. यावेळी त्याने घराच्या मागील बाजुने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पाठलाग करत असतना आरोपी सचिनने त्याच्या ताब्यातील कार्बाईन गनने दोन गोळ्या पोलिसांवर झाडल्या परंतु कोणास इजा पोहचली झाली नाही. पोलीसांनी प्रत्युउत्तरात फायर केले. असता सचिनच्या डाव्या पायाला गोळी लागली. त्यास अटक करुन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.आरोपी सचिन जवळ असलेली गन पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यात ६ जिवंत गोळ्या पोलिसांनी जप्त केली आहे. ही घटना घडताच परिसरात खळबळ उडाली असून परिसरातील नागरिक पाहण्यासाठी गर्दी केली होती.आरोपी सचिनने पुणे जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक गुन्हे केले असून तो एक-दीड वर्षापासून चाळीसगावात वास्तव्यात होता. येथे तो ‘शिवाजी पाटील’ या नावाने राहात होता. त्याला पकडण्यासाठी एलबीसी पथकात पोउनि अंकुश माने, हवालदार दत्तात्रय गिरीमकर, पोकाँ बाळासाहेब सकाटे, निलेश कदम, अनिल कोकणे, लियाकत मुजावर, पल्लवी गायकवाड व ढम्मरे यांचा समावेश होता. दरम्यान पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.पोलीस होते मागावर१० सप्टेंबर रोजी यवत येथे पुणे मध्यवर्ती बँकेच्या शाखेत दरोडा पडला होता. यात ६६ लाख रुपयाची रोकड लंपास झाली होती. याच्या तपासासाठी पुणे अन्वेषण शाखा पोलीस सचिन याच्या मागावर होते. तो चाळीसगाव येथे असल्याचे समजल्यावर पोलिसांनी १ रोजी पहाटे त्याला पकडण्यासाठी सापळा लावला.

चाळीसगाव येथे मालमत्तासचिन याने चाळीसगाव येथे धुळे रोडलगत मोठे घर विकत घेतले आहे. त्याच्या बंगल्याचे बांधकामही सुरु आहे. त्याच्याकडे कार्पिओ, जेसीबी व पाण्याचे टँकर व ट्रॅक्टर तसेच पंजाब पासिंगची मोटरसायकल मिळून आली.दुसरा आरोपी पळालापोलिसांना हवा असलेला दुसरा आरोपी ज्ञानेश्वर माऊली लोहेकर उर्फ दीपक दादासाहेब देशमुख हा मात्र या ठिकाणाहून निसटण्यास यशस्वी झाला. कार्बाईन गन जप्तसचिन याने त्याच्याकडील कार्बाईन गन मधून पीएसआय अंकुश माने यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. काररवाईत ही गन व सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे.