शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

टाळेबंदीत केलेल्या चोरी-घरफोड्यांचा पर्दाफाश ; 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 3:46 PM

मुंबई,पालघर व ठाणे भागात घरफोड्या करणाऱ्या दोन चोरट्यांना माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

आशिष राणे 

वसई - कोरोना काळात टाळेबंदीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातल्या विविध भागातील "वाईन शॉप्स"मध्ये चोऱ्या-घरफोड्या करून लाखो रुपयांचा देशी विदेशी मद्याचा साठा व रोख रक्कम चोरून पोबारा केलाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मुंबई,पालघर व ठाणे भागात घरफोड्या करणाऱ्या दोन चोरट्यांना माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असल्याने टाळेबंदी दरम्यान वाईन शॉप्समधील केलेल्या चोरी- घरफोडीचा पर्दाफाश झाला आहे.

पोलिसांनी या गुन्ह्यामधील 1 ) महावीरसिंग जोरसिंग कुमावत (राजपूत ) वय 32 ,रा.फुलवाडी ,मक्का मजीद ,उदांना दरवाजा (सुरत) गुजरात, 2 ) मनीष विरेंद्र सरकार वय 35  रा.साधना बि.वलाई पाडा ,संतोष भुवन ,नालासोपारा पूर्व, वसई अशी या दोन आरोपींची नावे असून यांनी चौकशीत अन्य अजून एक साथीदार असल्याचे सांगत आम्ही वसईसहित दहिसर व काशिमीरा येथे चोरी घरफोड्या केल्याची कबुली माणिकपूर पोलिसांना दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरट्यांनी अन्य साथीदाराच्या सोबतीने पालघर (वसई) तच  नाही तर दहिसर (मुंबई) ,व काशिमीरा (ठाणे ) येथील दोन वाईन शॉप्स फोडून तेथील लाखोंचा दारूसाठा व रोख रक्कम लुटली आहे. परिणामी गुन्हे शाखेच्या टीमने या दोन आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन,रोख रक्कम,तसेच वाईन शॉप्समधील एकूण 3 लाख 20 हजार  रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अन्य काशिमीरा पोलीस ठाणे व दहिसर पोलीस ठाणेमधील नमूद गुन्ह्याची देखील कबुली या चोरटयांनी दिली आहे.     वसई पूर्वेतील वसंत नगरीतील गोल्डन बिल्डिंग मधील "सनी वाईन शॉप्स" बाबत घडली आणि हे दुकान चक्क रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील देशी-विदेशी दारूचा माल व रोख रक्कम असा मिळून आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.या प्रकरणी दुकान व्यवस्थापकाने माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी त्या अज्ञात चोरट्यावर चोरी- घरफोडीचा गुन्हा दाखल केला व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता या गुन्ह्याची उकल झाली आहे.वाईन शॉप्समधील चोऱ्या व घरफोड्या प्रकरणांचा छडा लावताना माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,तसेच पोलीस उपधीक्षक डॉ.अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून दहिसर, काशिमीरा, वालिव आदी परिसरात सर्च ऑपरेशन राबवले व गुप्त माहितीच्या आधारे या टीमने दोन संशयितांना ताब्यात घेतले व त्यांची सखोल चौकशी केल्यावर त्याच्या सोबत अजून एक अन्य साथीदार असल्याचे ही स्पष्ट झाले.  

एकूणच गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली माणिकपूर पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे,पोलीस निरीक्षक विलास सुपे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा.पो.नि.सचिन सानप, पो.उप.नि.उमेश भागवत , सहा.फौज.बाळू बांदल, पो.हवा.शैलेश पाटील, पो.ना.कपिल नेमाडे , अशोक वळवी, कल्पेश किणी आणि पो.काँ.किरण आव्हाड यांनी कोरोना संक्रमण काळातही रात्र दिवस अथक परिश्रम घेऊन या गंभीर गुन्ह्याची उकल केल्याची कामगिरी पार पाडल्याने सर्वत्र पोलीस व जनतेत त्यांचे कौतुक होत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी

सोशल मीडियावर व्हायरल होणारा 140 नंबरबाबतचा 'तो' मेसेज म्हणजे अफवा

CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम

CoronaVirus News : धडकी भरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार

CoronaVirus News : चिंताजनक! "2021च्या आधी Corona Vaccine शक्य नाही"

CoronaVirus News : सलाम! ...म्हणून ड्युटी संपल्यावर खास कोरोनाग्रस्तांसाठी नर्स वाजवते वायोलिन

 

             

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईthaneठाणे