कोल्हापूर : मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपी रूद्रगोंडा पाटील याच्या मोबाईल लोकेशनवरून पोलिसांची पथके त्याचा माग काढत आहेत. याशिवाय समीर हा गेल्या आठ महिन्यांपासून रूद्रगोंडा याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचेही समजते.कोल्हापूर पोलीस तसेच एसआयटी, एनआयए आणि कर्नाटक पोलिसांचे पथक असे रूद्रगोंडा पाटील याच्या मागावर वेगवेगळ्या ठिकाणी गेली आहेत. रूद्रगोंडा पाटील याने विविध ठिकाणी वेगवेगळे मोबाईल वापरले असून त्या मोबाईलच्या लोकेशनवरून पोलीस त्याचा माग काढत आहेत. सध्या अटकेत असलेला समीर हा गेल्या आठ महिन्यांपासून रूद्रगोंडा याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. समीरकडे रूद्रगोंडा पाटीलबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्याने रूद्रगोंडा पाटील याला आपण ओळखत नसल्याचे सांगून तपासकामात असहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
रुद्रच्या मागावर पोलीस
By admin | Published: September 22, 2015 2:01 AM