शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

पोलिसांना गूढ उकलेना

By admin | Published: August 28, 2015 5:12 AM

तीन वर्षांपूर्वी घडलेल्या शीना बोरा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना अद्याप यश आले नाही. अनेकांचा जबाब नोंदवूनही हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

मुंबई : तीन वर्षांपूर्वी घडलेल्या शीना बोरा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना अद्याप यश आले नाही. अनेकांचा जबाब नोंदवूनही हत्येमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपी व शीनाच्या नातेवाइकांचे जबाब याव्यतिरिक्त कोणताही थेट पुरावा नसल्याने अटकेत असलेल्या हायप्रोफाईल आरोपींविरोधात न्यायालयीन लढा कसा द्यायचा या विचाराने सध्या पोलीस पूर्णपणे चक्रावून गेल्याचे दिसते. खार पोलिसांनी या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी, तिचा वाहनचालक श्याम राय, तिचा दुसरा पती संजय खन्ना यांना अटक केली आहे. यापैकी इंद्राणी व राय यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. तर खन्ना यांना कोलकात्याहून गुरुवारी रात्री उशिरा मुंबईत आणण्यात आले. त्यांना उद्या, (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरुवात होईल. मात्र आतापर्यंत पोलिसांकडे इंद्राणी, राय यांच्यासह शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल, शीनाचा प्रियकर व सावत्र भाऊ राहुल मुखर्जी यांचेही जबाब आहेत. मात्र हत्या झाली आणि ती याच आरोपींनी केली हे सांगणारे थेट पुरावे पोलिसांकडे नाहीत. शीनाचा मृतदेह किंवा मृतदेहाच्या अवशेषांची पेण पोलिसांनी २०१२मध्येच विल्हेवाट लावलेली आहे. तसेच हा मृतदेह तीन आरोपींनी खोपोली-पेण रस्त्यावरील गागोदे खिंडीतल्या जंगलात पेटवून दिला, हे सांगणारा एकही प्रत्यक्षदर्शी नाही. त्यामुळे खार पोलिसांना आरोपींविरोधातला खटला चालविण्यासाठी पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.इंद्राणी ही देशातील सर्वांत प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी असल्याने पोलीस तिच्याविरोधात कारवाई करताना अत्यंत सावध भूमिका घेत आहेत. त्यासाठीच आज आयुक्त मारिया, सहआयुक्त देवेन भारती, अपर आयुक्त छेरींग दोरेजे, उपायुक्त सत्यनारायण चौधरी, एसीपी संजय कदम या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक तास इंद्राणी व राय यांची कसून चौकशी केली. तसेच तपास पथकासोबत या प्रकरणी पुढे पुराव्यांची भक्कम मालिका कशी उभी करायची याबाबतही बराच काळ खल केला.इंद्राणी, संजीवने केले कृत्य?वाहनचालक राय याने ही हत्या इंद्राणी व संजीव यांनी मिळून केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मी त्या वेळी फक्त गाडी चालवत होतो. पाठी काय घडले त्यात माझा काहीही सहभाग नव्हता. तसेच मृतदेहाची विल्हेवाटही या दोघांनीच लावली. मी त्या वेळी गाडीत होतो, असा दावाही रायने केला आहे. जर तपासात रायचा सहभाग अस्पष्ट असेल तर त्याला साक्षीदार किंवा माफीचा साक्षीदार करता येईल का याबाबत आज खार ठाण्याच्या बंद खोलीत चर्चा झाल्याचे समजते. पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुलचे शीनासोबत प्रेमसंबंध होते. दोघे लग्नाच्या विचारात होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र हे संंबंध पीटर व इंद्राणी यांना खटकत होते. कारण शीना ही इंद्राणी व तिचे पहिले पती सिद्धार्थ दास यांची मुलगी होती. त्यानुसार शीना व राहुल हे सावत्र भाऊ-बहीण आहेत. नॅशनल महाविद्यालयापर्यंत शीनाला राहुलने आपल्या कारने सोडले होते. तसेच इंद्राणीने बोलावल्यानुसार शीना तिला भेटत होती हे राहुलला आधीपासूनच माहीत होते. त्यामुळे राहुलने शीनाला अखेरचे इंद्राणीसोबत पाहिले, असे त्याने आपल्या जबाबात सांगितल्याचे समजते.शीनाची हत्या अत्यंत शांत डोक्याने व कट आखून केल्याचे आतापर्यंच्या तपासातून स्पष्ट होत असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले. हत्येनंतर शीनाच्या नावे मुंबई मेट्रो वन कंपनीत तिचा राजीनामा पाठविणाऱ्या तसेच ती ज्या घरात भाड्याने राहात होती तेथील घरमालकाला भाडेकरार संपविण्याबाबत पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा जबाब खार पोलिसांनी नोंदवला आहे. या व्यक्तीने इंद्राणीसाठी दोन्ही कागदपत्रांवर शीनाच्या खोट्या सह्या केल्या होत्या. इंद्राणीने हत्येची कबुली दिली का, या प्रश्नावर मात्र मारिया यांनी बोलणे टाळले. डीएनए चाचणीसाठी नमुने : ज्या ठिकाणी शीनाचा मृतदेह जाळण्यात आला त्या पेणच्या गागोदेतील ठिकाणाहून डीएनए चाचणीसाठी आवश्यक असलेले अवशेष हाती लागल्याची माहिती या हत्याकांडाच्या तपासाशी संलग्न असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.