ठाणे : बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील चौघा नगरसेवकांविरुद्ध ‘मोक्कां’तर्गत कारवाई होऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केल्याने त्यांचा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम २५ जानेवारीपर्यंत वाढला आहे.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महापालिकेत गोल्डन किंवा सिल्व्हर की कॉपर, कोणतीही गँग असली तरी त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल. तसेच प्रसंगी अशा संघटित गुन्हेगारांवर गरज पडल्यास ‘मोक्का’ लावायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या संकेतानंतर पोलिसांनी नगरसेवकांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याकरिता चाचपणी सुरू केल्याचे कळते. त्याचेच संकेत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले.दरम्यान, बांंधकाम व्यावसायिक परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेतील ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, मनसेचे सुधाकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नजीब मुल्ला आणि काँग्रेसचे माजी गटनेते विक्र ांत चव्हाण यांच्या शरणागतीनंतर सुरुवातीला त्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर, चौघांनाही २८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यामुळे सोमवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांनी त्यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ केल्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा मध्यवर्ती कारागृहात झाली. (प्रतिनिधी)सुधाकर चव्हाणांना हवा पलंगमनसेचे सुधाकर चव्हाण यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे त्यांनी तुरुंगात झोपण्याकरिता आपल्याला पलंग व अन्य सुविधा देण्याची मागणी करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.या चौघांवर ‘मोक्का’ची कारवाई करण्याबाबत चाचपणी केली. मात्र, अद्याप कुठल्याही ठोस निष्कर्षाप्रत पोलीस आलेले नाहीत. योग्य वेळी याबाबतची माहिती दिली जाईल. -दिलीप गोरे, सहायक पोलीस आयुक्त
‘मोक्का’ लावण्यासाठी पोलिसांची चाचपणी?
By admin | Published: January 12, 2016 2:29 AM