ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 24 - पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीप्रसंगी ग्रामस्थांनी एका पोलीस काँस्टेबलवर हल्ला चढवित त्याला जखमी केले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. महादेव राधुजी शिंदे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांनी याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात शिंदे यांनी तक्रार दिली आहे. आल्हनवाडी सेवा संस्थेच्या रविवार २३ आॅक्टोबरला झालेल्या निवडणुकीसाठी शिंदे बंदोबस्तावर होते. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरील मतदारांना चिठ्ठ्या देणाऱ्या टेबलजवळ गर्दी झाल्याने तेथे जाऊन रांगेत उभे रहा, असे मतदारांना सांगत होतो. तेव्हा एकाने माझा हात धरुन ढकलून खाली पाडले. त्याचवेळी दहा ते पंधरा जणांनी हल्ला चढवित पोटावर, छातीवर लााथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचे चित्रीकरणदेखील करण्यात आले आहे. त्यावरुन आल्हनवाडी येथील परमेश्वर कर्डिले, नितीन कर्डिले, सचिन गव्हाणे यांच्यासह एकूण तेरा जणांविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, लाथाबुक्क्यांनी मारहाणे करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार विकास घनवट तपास करीत आहेत.