शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पोलिसांच्या गुन्हेगारीची चिंता

By admin | Published: June 09, 2017 1:01 AM

कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलीस खात्यात रुजू झालेले पोलीसच गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : अवैध धंदे, तसेच बेकायदा कृत्य करणाऱ्यांना अटकाव आणून कायदा, सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलीस खात्यात रुजू झालेले पोलीसच गुन्हेगारी घटनांमध्ये सहभागी असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. इंधन (डिझेल) चोरी रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. कुंपनानेच शेत खाण्याचा हा प्रकार असून याबद्दल नागरिक चिंता व्यक्त करू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, असे धनाढ्य लोक सैरभर धावू लागले. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद झाल्यानंतरही काही जण अशा नोटांची बंडले घेऊन काळा पैसा, पांढरा करण्यासाठी सैरभर धावत होते. त्यातील काही लोक पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी मोटार अडवून चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजारच्य नोटांची बंडले जप्त केली. कोट्यवधीच्या रकमेतील काही रक्कम स्वत:कडे ठेवून उर्वरित रक्कम पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी सुमारे ६६ लाख रुपये रकमेचा घोळ केल्याचे नंतर उघडकीस आले. दिघी येथे जुगार अड्यावर छापा मारून जप्त केलेली रक्कम रीतसर पोलीस ठाण्यात जमा न करता पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वत:कडे ठेवली. या रकमेचा पोलीस कर्मचाऱ्यांकडून अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या घटना ताज्या असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी पेट्रोल चोरीच्या रॅकेटमध्ये प्रत्यक्ष चोरीच्या कृत्यात सहभाग घेतला असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. महामार्गवरील इंधन वाहिनी फोडून त्याला व्हॉल्व्ह बसवून लाखोंचे डिझेल विक़्री करणारी टोळी पोलिसांची होती, हे ऐकून नागरिकांना धक्का बसला आहे. देहूरोड, लोणी काळभोर, हडपसर आदी भागात हे प्रकार सर्रास घडत आहेत.>अवैध वाहतूक करणारी वाहने पोलिसांचीचपिंपरी-चिंचवडमधील काही मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये अप्रत्यक्षपणे काही पोलीस अधिकाऱ्यांची भागीदारी आहे. एवढेच नव्हे तर चिंचवड ते मुंबई या मार्गावर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये काही पोलिसांची वाहने असल्याची चर्चा आहे. पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग अथवा वरदहस्त असल्याशिवाय राजरोसपणे असे व्यवहार होणार नाहीत. हे नागरिकांनाही आता कळून चुकले आहे.