नाशिक : बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह दहा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे आयकर विभाग युनिट एक व आडगाव पोलिसांनी गुरुवारी (दि़ २२) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून ११ संशयितांकडून १़३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांमध्ये नाशिक शहर राष्ट्रवादी काँगे्रसचा माजी पदाधिकारी छबू नागरे, महापालिकेचा माजी घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील व सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर यांच्यासह आदि संशयितांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मुदत संपल्यानंतरसर्वांना पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी संशयित आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संशयितांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच काही संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल असून, यांची साखळी, मोठी टोळी या बनावट नोटा छापण्याच्या गुन्ह्यामागे असू शकते असेही सांगितले.न्यायाधीश डिंपल देढीया यांनी ११ संशयितांच्या पोलीस कोठडीत दोन जानेवारीपर्यंत वाढ केली. (प्रतिनिधी)‘निमा’मध्ये बैठक : बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित छबू नागरे हा नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचा (निमा) निमंत्रित सदस्यांपैकी एक आहे. त्याचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत ‘निमा’च्या कार्यालयात सर्व संचालकांची तातडीने बैठक बोलवली. गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या या बैठकीत रात्रीपर्यंत निर्णय झालेला नव्हता.
छबू नागरेसह १० जणांच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Published: December 30, 2016 2:02 AM