जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे पत्नीसह दोन मुलींना ठार करणार्या आरोपीस १३ मार्च रोजी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. समाधान शेषराव अंभोरे (४६) याने त्याची पत्नी मीना, तसेच अश्विनी, अंकिता आणि गोपाल या चिमुकल्या मुलांवर शुक्रवारी मध्यरात्री झोपेतच लोखंडी पहारीने वार केले होते. या नृशंस हत्याकांडात सौ. मीना आणि अश्विनी, तसेच अंकिता या दोन्ही मुली ठार, तर मुलगा गोपाल गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी समाधान अंभोरे याला जानेफळ पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. रविवारी त्याला मेहकर येथील न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मृतक मीना अंभोरे हिचा सासरच्या मंडळीकडून छळ होत असे. तिचे माहेरी येणे-जाणे बंद केले होते, अशी तक्रार मीनाचे भाऊ खंडाळा येथील गजानन प्रल्हाद मानघाले यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला दिली असून, याप्रकरणी संपूर्ण अंभोरे कुटुंबियांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.माहेरी झाले अंत्यसंस्कारसौ. मीना अंभोरे हिच्यासह अश्विनी वअंकिता या चिमुकलींवर सौ. मीनाच्या माहेरी, मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने खंडाळा गावावर शोककळा पसरली होती.
कासारखेड हत्याकांडातील आरोपीला पोलीस कोठडी
By admin | Published: March 14, 2016 1:51 AM