गजा मारणे टोळीचा गुंड : सहायक निरीक्षकासह पोलीस कर्मचारी जखमीपुणे : कुख्यात गजा मारणे टोळीचा गुंड सागर राजपूत याच्याशी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाशी मध्य प्रदेशात चकमक उडाली. गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पथकातील सहायक निरीक्षक रणजित भोईटे आणि पोलीस कर्मचारी दिलीप मोरे यांना गोळ्या लागल्या असून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना बुधवारी रात्री बडोदा येथे घडली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना गजा मारणे टोळीचा सराईत गुंड सागर राजपूत हा बडोदा येथे असल्याची माहिती मिळाली होती. राजपूत मागील दिड वर्षांपासून फरार होता. निलेश घायवळ आणि गजा मारणे टोळी युद्धामधून झालेल्या पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात तो फरार होता. मारणे टोळीवर मोक्का लावण्यात आलेला आहे. या चकमकीत सागर राजपूतच्या पायाला गोळी लागली आहे.त्यामध्ये तो गंभीर जखमी झाले आहेत.
सहायक निरीक्षक भोईटे आणि त्यांचे पथक बडोदा येथे चार दिवसांपूर्वी गेले होते. राजपुतला अटक करण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एक गोळी भोईटे यांच्या पायाला लागली आहे. तर मोरे यांच्या पाठीत गोळी लागली आहे. एवढ्या जखमी अवस्थेतही जिगरबाज पोलिसांनी राजपुतच्या मुसक्या आवळल्या आहेत. तो पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.भोईटे यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात एलसीबीला नेमाणुकीस होते. सहायक निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्यावर ते पुणे शहरात बदलून आले. ते सध्या गुन्हे शाखेच्या गुंडा स्क्वॉड मध्ये असून त्यांचे खबरयांचे जाळे तगडे आहे.