शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

पोलीस दल ‘स्मार्ट’ बनविणार

By admin | Published: November 30, 2015 3:04 AM

पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट’ बनविण्यावर भर आहे.

नागपूर : पोलीस दलाचे केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही. तर, मनुष्यबळासोबतच माहिती व तंत्रज्ञानाची जोड देऊन राज्य पोलीस दलाला ‘स्मार्ट’ बनविण्यावर भर आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात नागरिकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यात यश मिळेल आणि गुन्हेगारांवरही जरब बसविणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस नियंत्रण कक्षातील अद्ययावत ‘डीसीआरएमएस डायल १००’ प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सकाळी केले. यानिमित्त नियंत्रण कक्ष परिसरात आयोजित कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, आ. प्रकाश गजभिये, आ. सुधाकर देशमुख मंचावर उपस्थित होते. ही अत्याधुनिक यंत्रणा नागपूर पोलिसांनी सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले. डीसीआरएमएस डायल १००, सीसीटीव्ही प्रणालीमुळे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचतील. गुन्हेगारांना जेरबंद करून ते गुन्ह्याचा तातडीने उलगडा करू शकतील आणि कोर्टात गुन्हेगारांविरुद्ध ठोस पुरावे सादर करून दोष सिद्धतेचे प्रमाण वाढवता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.२००८च्या मुंबई हल्ल्यानंतर सीसीटीव्ही नेटवर्क लावण्याबाबत तत्कालीन सरकारने निर्णय घेतला. मात्र, त्याची पूर्तता करण्यात कमालीची दिरंगाई झाली. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या चार महिन्यांत आम्ही वर्कआॅर्डर दिली आणि सीसीटीव्ही नेटवर्कचा पहिला फेज (१२०० कॅमेऱ्यांचा) पूर्ण झाला. त्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी होणार आहे. सीसीटीव्ही नेटवर्कचा उर्वरित टप्पा आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)