पंढरपूर - घरात भांडण झाल्याने घरातून पळून आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पुण्यातून आलेल्या वारकरी दिंड्यांसोबत आलेल्या मुलाला पोलिसांनी आधार दिला. अनोळखी ठिकाणी आल्याने घाबरलेला हा मुलगा उपाशीपोटी रडत असताना पोलिसांना सापडला त्यानंतर पोलिसांनी त्याला चहापाणी पाजत त्याला स्थानिक पोलिसांच्या हवाली केले. आषाढी एकादशीनिमित्त सध्या पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी आहे. या गर्दीमध्ये बंदोबस्तास आलेले पोलीस शिपाई बसवराज पाटील यांना एक मुलगा रडताना दिसला. त्यांनी या मुलाची आपुलकीने चौकशी केली. तेव्हा त्याने आपले नाव श्रवण असून, आपण घरात भांडण झाल्याने घरातून पळून दिंडीसोबत पंढरपुरात आल्याचे सांगितले. त्यानंतर एएसआय सुळ, पोलीस शिपाई अहिरे आणि पोलिस शिपाई बसवराज पाटील यांनी त्याला चहा पाणी पाजले. तसेच त्याच्या आई-वडिलांशी संपर्क करून त्याला स्थानिक पोलिसांकडे सुखरूपपणे सोपवले.
घरातून पळून पंढरपूरला आलेल्या मुलासाठी पोलीस बनले माऊली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 10:44 PM