शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पोलिसाने तयार केले बॉम्ब हाताळणारे यंत्र

By admin | Published: July 04, 2015 12:52 AM

राज्यातील पहिलेच यंत्र : १२ किलो वजन उचलण्याची क्षमता

कोल्हापूर : कोणतेही अभियांत्रिकी शिक्षण नाही...फक्त अनुभवाची शिदोरी...या बळावर बारावी उत्तीर्ण इतकेच शिक्षण झालेल्या पोलीस नाईक हृषीकेश विजयकुमार ठाणेकर यांनी बॉम्ब हाताळणारे (रिमोटली आॅपरेट व्हेईकल) यंत्र तयार करण्याची किमया केली आहे. राज्यातील हे पहिलेच यंत्र असून भविष्यात यामुळे बॉम्बस्फोटासारख्या गंभीर घटना टळून लोकांचे प्राण वाचू शकतील. या यंत्राचा लवकरच पोलीस दलात समावेश झाला तर नवल वाटायला नको.ठाणेकर हे मूळचे मलकापूरचे असले तरी त्यांचे वडील पोलीस दलात असल्याने त्यांचे संपूर्ण वास्तव्य कोल्हापुरात गेले. सध्या ते कळंबा रिंगरोडवरील प्रथमेशनगर येथे राहतात. सेवा बजावताना वडिलांचे निधन झाले. अचानक ओढावलेल्या संकटाने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांच्या जागेवर हृषीकेश यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. कोल्हापुरातील बॉम्बशोध व नाशक पथकात त्यांची नियुक्ती झाली. पुण्यातील एम.आय.एम. इन्स्टिट्यूट येथे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण घेऊन ते सेवेत रूजू झाले.दोन वर्षांपूर्वी कागल तालुक्यात जिवंत बॉम्ब सापडले. ते निकामी करताना अनेक जणांचे प्राण पणाला लागले होते. त्या दिवसापासूनच अशाप्रकारचे बॉम्बला मानवी हात न लागता त्याची परस्पर कशा पद्धतीने विल्हेवाट लावता येईल. याबाबत मनाशी खूणगाठ बांधून ठाणेकर यांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. आठ महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना बॉम्ब हाताळणारे प्राथमिक स्तरावरील यंत्र दाखवून प्रात्यक्षिक सादर केले. ज्याच्याकडे कोणतीही अभियांत्रिकीची पदवी नाही; निव्वळ अनुभवाच्या जोरावर केलेला यशस्वी प्रयत्न पाहून पोलीस अधीक्षकांनी त्यांना परवानगी दिली. त्या प्रेरणेने ठाणेकर यांनी काम सुरू केले.अगदी स्वस्तातील व बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूपासून त्यांनी यंत्राची निर्मिती सुरू केली. खुल्या जागेवर कुठेही जाणारे हे रिमोटवरील यंत्र संशयास्पद वस्तू उचलून बाजूला नेऊन ठेवू शकते. १२ किलोपर्यंतचे ओझे ते उचलू शकते. त्याची लांबी ३० इंच व रुंदी २४ इंच इतकी आहे. या यंत्राचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून ते रिमोटद्वारे बॉम्बसदृश वस्तू सुरक्षितस्थळी नेऊन ठेवू शकते. हे यंत्र अडचणीच्या ठिकाणी कुठेही जाऊ शकेल, यासाठी त्याला लागणारी चाके यांचे काम सध्या सुरू असून ते १० टक्के आहे तसेच यंत्राच्या हँड व आर्मवरील जागेचे ५ टक्के बाकी आहे. त्यावर बॉम्ब निकामी करण्याचे यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रासाठी ४० हजार रुपये इतका खर्च झाला असून त्याला लागणारे साहित्य बाजारात कमी खर्चात व सहज उपलब्ध होणारे आहे.बॉम्ब हाताळणाऱ्या यंत्राच्या निर्मितीसाठी पोलीस अधीक्षकांनी दिलेली परवानगी हीच आपल्या कामाची पोहोच पावती आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात गडचिरोलीच्या नक्षलवादीविरोधी पथकासमोर यंत्राचे प्रात्यक्षिक झाले आहे. हे यंत्र फक्त बॉम्ब हाताळू शकते. त्यापुढेही जाऊन बॉम्ब निकामी करण्याची यंत्रणा यावर बसवून एक परिपूर्ण व सक्षम यंत्र लवकरच सर्वांसमोर आणले जाईल.-हृषीकेश ठाणेकर, पोलीस नाईक, शाहूपुरी पोलीस ठाणे