शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
3
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
4
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
5
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
7
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
8
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
9
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
11
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
13
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
14
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
15
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
16
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
17
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
18
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन कबर सुशोभिकरण प्रकरणी पोलीस तपास सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 9:14 AM

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याचा भाऊ असलेल्या याकूब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने २००७ मध्ये भादंवि कलम १२० (ब) अन्वये गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

मुंबई: मुंबईसह देशाला हादरवून टाकणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या चौथऱ्याला संगमरवरी लाद्या बसवत तिचे सुशोभिकरण करण्याच्या प्रकाराचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. 

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याचा भाऊ असलेल्या याकूब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने २००७ मध्ये भादंवि कलम १२० (ब) अन्वये गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

याकूब मेमन याला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले. त्यानंतर याकूब मेमन याला मरिन लाइन्स रेल्वे स्थानक येथील बडा कब्रस्थान दफनभूमीत दफन करण्यात आले होते. याकूब मेमनच्या कबरीची जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. 

त्यानंतर आता ही कबर लाद्या -बसवून रंगरंगोटी करून सजविण्यात आली आहे. त्यामुळे खरोखरच मुस्लीम दफनभूमी ट्रस्टने ही जागा विकली आहे का? कबर सुशोभीकरणाला कोणी परवानगी दिली? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. हे सुशोभिकरण कोणी व का केले? यासाठी कुणाचा पैसा वापरण्यात आला? याबाबत मुंबई पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

 

टॅग्स :MumbaiमुंबईBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे