शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

बसव महामोर्चावर पोलिसांचा लाठीमार

By admin | Published: February 23, 2016 12:47 AM

कौठा येथे बसवेश्वर महाराजांचा पुतळा स्थापन करण्याच्या मागणीसाठी, तीन तास ठिय्या देऊनही पालिका आयुक्तांनी भेट नाकारल्याने, बसव महामोर्चेकऱ्यांनी दगडफेक सुरू केल्याचा प्रकार

नांदेड : कौठा येथे बसवेश्वर महाराजांचा पुतळा स्थापन करण्याच्या मागणीसाठी, तीन तास ठिय्या देऊनही पालिका आयुक्तांनी भेट नाकारल्याने, बसव महामोर्चेकऱ्यांनी दगडफेक सुरू केल्याचा प्रकार सोमवारी घडला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात २५ आंदोलक जखमी झाले़ महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीने कौठा परिसरातून पालिकेवर महामोर्चा काढला होता़ १५ हजारांहून अधिक वीरशैव बांधव यात सहभागी झाले होते़ दुपारी मोर्चा मनपावर धडकला़ आ़ हेमंत पाटील, आ़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़ सुभाष साबणे, आ़ डॉ़ तुषार राठोड यांनी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी पाठिंबा दर्शवित, काँग्रेसवर कडाडून टीका केली़, तसेच आयुक्त सुशील खोडवेकर यांनी आंदोलन स्थळी येऊन निवेदन घ्यावे, अशी मागणी केली़राष्ट्रसंत डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतरही आयुक्त आले नाहीत. त्यामुळे आंदोलकांनी तीन तास ठिय्या दिला़ सायंकाळी अध्यक्ष प्रकाश कौडगे यांनी गाढवाला निवेदन देऊन मोर्चाचा समारोप केला़ मंगळवारी सर्वपक्षीय जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)आमदार व्यासपीठावरून खाली उतरताच, संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला़ यात एका डॉक्टरसह २० ते २५ आंदोलनकर्ते जखमी झाले़ रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.