मुंबई : दहीहंडी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अजूनही बालगोविंदाचा मुद्दा त्रिशंकू अवस्थेतच आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाचा ट्रेलर असणा:या नारळीपौर्णिमेला होणा:या ‘चोरगोविंदा’वर सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे. चोरगोविंदाच्या आयोजकांनी या बालगोविंदाच्या मुद्दय़ावर दुहेरी भूमिका घेतल्यामुळे आयोजकांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
बालहक्क संरक्षण आयोगाने 12 वर्षाखालील बालगोविंदांना थरांवर चढण्यास बंदी घातली आहे. शिवाय, बालगोविंदांना चढविल्यास पोलिसांना कारवाईचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. त्यामुळे एका बाजूला या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी दहीहंडी समन्वय समितीचा संघर्ष सुरू आहे तर दुस:या बाजूला चोरगोविंदाच्या आयोजकांनी मात्र याबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. चोरगोविंदाच्या वेळी बालगोविंदा सहभागी झाले तर कारवाई होणार का, चोरगोविंदाला नामांकित गोविंदा पथके कोणती भूमिका घेणार, बालगोविंदाच्या सहभागाबाबत आयोजक जबाबदारी घेणार का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी सध्या गोविंदा पथकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
नारळीपौर्णिमेला पार पडणा:या चोरगोविंदाच्या काही आयोजकांनी ‘बालहट्ट’ कायम ठेवत बालगोविंदांना चढविणारच असा आक्रमक पवित्र घेतला आहे; तर काहींनी बॅनरवरच नियम व अटींचा उल्लेख करत बालगोविंदांना थरात सहभागी होता येणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
गेली कित्येक वर्षे मुंबई शहर, उपनगरांत चोरगोविंदाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी गोविंदा पथकांची रंगीत तालीम असते. यामुळे प्रत्येक गोविंदा पथकाला त्यांची सरावाची पात्रता लक्षात येते. सलामी दिल्यासही आयोजकांकडून बक्षिसांची लयलूट होते. यामध्ये पुरुषांप्रमाणो महिला गोविंदा पथकेही मोठय़ा प्रमाणावर सहभागी होतात. (प्रतिनिधी)
च्आम्ही गेली 11 वर्षे चोरगोविंदाचे आयोजन करतो. गेल्या वर्षी एका गोविंदा पथकाने आठ थर लावून दहीहंडी फोडली होती. आठ थर लावायचे असल्यास त्या पथकात बालगोविंदाचा समावेश असतो. त्यामुळे आम्ही केवळ या उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उमरखाडी येथील यंग उमरखाडी सार्वजनिक दहीहंडी मंडळाने सांगितले.
च्बालहक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून, यंदा आमच्या उत्सवात बालगोविंदाला थरांवर चढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. बालगोविंदाच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय योग्य आहे. यासंदर्भात, आम्ही बॅनरवरच आमचा निर्णय जाहीर केल्यामुळे गोविंदा पथकांना सहभाग घेणो अधिक सोपे होईल, असे गिरगाव येथील श्री जरीमरी दहीकाला उत्सव मंडळाच्या कार्यकत्र्यानी सांगितले.
च् बालगोविंदाच्या सहभागाबाबत आयोजक जबाबदारी घेणार का, अशा प्रश्नांनी गोविंदा पथकांत गोंधळ निर्माण झाला आहे.