शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

धनगर समाजाच्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 5:43 AM

पोलिसांची कारवाई : आरक्षणासाठी विधान भवनावर काढला मोर्चा

पनवेल : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी महाड चवदार तळे ते मुंबई विधानभवनावर धडकणाऱ्या हजारो मोर्चेकऱ्यांना बुधवारी नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले. या मोर्चात राज्यभरातील धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आले होते. मोर्चेकºयांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा मुंबई-गोवा महामार्गासह सायन-पनवेल महामार्गावर उपस्थित होता .

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. महाड चवदार तळे येथून मानवंदना दिल्यांनतर पनवेल, कामोठेवरून आंदोलनकर्त्यांची पदयात्रा विधानभवनावर धडकणार होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड जिल्ह्यातून धनगर समाजाचे बांधव या वेळी उपस्थित होते. मात्र, पनवेलमध्ये आंदोलनकर्ते दाखल होताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरु वात केली. सायंकाळी ५.१५ च्या दरम्यान आंदोलनकर्ते पळस्पे फाटा ते कळंबोली याठिकाणी दाखल झाले होते. या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शासनाच्या निषेधार्थ कळंबोली सर्कल याठिकाणी काही वेळ ठिय्या मांडला. या वेळी सायन-पनवेल महामार्गावर सुमारे ३० मिनिटे वाहतूककोंडी झाली होती.

धनगर आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून शासन दरबारी पडून आहे. सध्याच्या राज्य शासनाचे शेवटचे अधिवेशन सुरू आहे. याकरिता अखेरचा लढा असल्याचे सांगत धनगर समाज विधिमंडळावर धडकणार होते. याकरिता महाड चवदार तळे सत्याग्रहाची ग्वाही देत आंदोलनकर्त्यांनी शासनाला शेवटचा दणका देण्याचा निश्चय केला होता. मात्र, हे आंदोलनकर्ते विधिमंडळावर धडकण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी रोखल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. या वेळी शासनाविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली . विशेष हणजे पिवळे झेंडे, मेंढरासह आंदोलनकर्ते विधिमंडळावर धडकणार होते. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेतल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.कळशांमध्ये पाणी भरत मुंबईकडे कूचधनगर समाजाच्या महाड ते मुंबई या आरक्षण पदयात्रेस बुधवारी महाड येथील चवदार तळ्यावरून प्रारंभ झाला. महाड येथून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नसल्याने पोलिसांनी धनगर समाजाच्या नेत्यांना महामार्गावरच रोखले. त्यानंतर काही तासांनी धनगर समाजाचे नेते आणि हजारो कार्यकर्ते आपल्या मेंढरांसह चवदार तळ्यावर दाखल झाले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत धनगर समाजाने चवदार तळ्याचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांनी चवदार तळ्याचे पाणी कळशांमध्ये भरून घेत मुंबईच्या दिशेने कूच केली.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण