डिप्पी वांकाणी, मुंबई महाराष्ट्र पोलीस दलात भरतीसाठी आलेल्या तरुणांची शारीरिक क्षमता चाचणीत भलतीच दमछाक होऊन काही जणांना जीव गमावावा लागला होता. त्यामुळे आता भरतीतील धावांचे अंतर कमी करण्यात आले असून, यापुढे ५ किलोमीटरऐवजी १६०० मीटरचे तर महिलांना ८०० मीटरचे अंतर धावावे लागेल. शिवाय, उमेदवाराच्या अंगाला एक चिप चिकटविली जाणार असून, या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल. पोलीस खात्यात भरती होण्यासाठी धावण्याची चाचणी घेतली जाते. यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उमेदवाराच्या अंगाला एक चिप चिकटविली जाईल. या चिपवर त्याने किती अंतर किती वेळेत कापले याची नोंद होईल. मुंबईमध्ये १.६ किलोमीटरचा मोकळा भाग कुठे आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही संपूर्ण चाचणी पूर्ण व्हायला १० दिवस तरी लागतील.इच्छुक उमेदवाराला पूर्ण २० गुण मिळविण्यासाठी पुरुषांना हे अंतर ४ मिनिटे ५० सेकंदांत व महिलांना २ मिनिटे ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करावे लागेल. त्याशिवाय गोळाफेक, लांबउडी, जोरबैठका व १०० मीटर वेगाने धावणे या प्रत्येकाला २० गुण आहेत. किमान १० जोरबैठका उमेदवाराला काढाव्या लागतात. परंतु पूर्ण २० गुण मिळविण्यासाठी १०० मीटरचे अंतर १२ सेकंदांत त्याला पार करावे लागते. या सगळ्या अटी महिलांनाही लागू आहेत अपवाद आहे तो जोरबैठकांच्या चाचणीचा, असे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ‘आम्ही कंपन्यांकडून या चिपसाठी निविदा मागविल्या असून, सध्यातरी ही एक चिप महाग (५० रुपयांना) आहे. इच्छुक उमेदवार चाचण्या देण्यासाठी ३०० रुपये शुल्क भरतो. या ३०० रुपयांतील काही पैसे राज्य सरकारला मिळतात. आम्हाला सरकारकडून या परीक्षा/चाचण्या घेण्यासाठी १.५ कोटी रुपये देण्यात आले आहेत व एवढ्या पैशांत या परीक्षांचे व्यवस्थापन होईल अशी आम्हाला आशा आहे. ही चिप कमी किमतीत मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’ रोज आम्ही नऊ हजारांपेक्षा जास्त इच्छुकांची धावण्याची परीक्षा घेत आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.गेल्या वर्षी धावण्याच्या चाचणीत काही उमेदवारांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर ही चाचणी तुम्ही अगदी सकाळी किंवा सायंकाळी घेणार का, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की आम्ही आधीच धावण्याचा वेळ कमी केला असल्यामुळे चाचणीचा वेळ (सकाळ किंवा सायंकाळ) हा काही अडथळा नाही. मुंबईत सध्या आम्ही १.६ किलोमीटरचा मोकळा पट्टा शोधत आहोत. चेंबूरमधील बीपीसीएल नजिकचा पट्टा निश्चित केला असला तरी अन्य पर्यायाच्याही शोधात आहोत, असेही त्याने सांगितले. गेल्यावर्षी पाच किलोमीटरचे अंतर पार करताना चार जणांचा मृत्यू झाला व त्यानंतर तीन वेळा हे अंतर कमी करण्यात आल्याचे वृत्त
पोलीस भरतीतील धाव ‘चिप’वर
By admin | Published: February 20, 2016 3:29 AM