शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

पोलीस पथक स्फोटातून बचावले, नक्षलवाद्यांचा घातपात करण्याचा डाव निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 1:22 AM

नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलीस पथक पायी जात असताना मुख्य मार्गालगत हे दोन स्फोट झाले.

घोटा (गडचिरोली) : नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलीस पथक पायी जात असताना मुख्य मार्गालगत हे दोन स्फोट झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घातपात घडविण्याचा नक्षल्यांचा डाव निष्फळ ठरल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील रेगडी उपपोलीस ठाण्यांतर्गत येणाºया रेगडी-कसनसूर मार्गावर रात्री नक्षलवाद्यांनी कुकरच्या साहाय्याने बनविलेला एक प्रेशर बॉम्ब (आयईडी) आणि लोखंडी पाईपमध्ये छर्रे भरून तयार केलेला एक क्लेमोर बॉम्ब जमिनीत पेरून ठेवला होता. पोलीस ठाण्यापासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर विकासपल्ली फाट्याजवळ नक्षल्यांनी आपले बॅनर लावल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने ते काढण्यासाठी पोलीस पथक गेले होते. तेथून ठाण्याकडे येत असतानाच पोलीस पथकापासून १०० फूट अंतरावर दोन्ही बॉम्बचा एकामागोमाग स्फोट झाला.याचवेळी एक युवक रस्त्याच्या कडेने झुडुपात लपत पळून जाताना आढळला. पोलिसांनी त्याचापाठलाग करण्याचा प्रयत्न केला,मात्र तो जंगलात दिसेनासाझाला. दोन्ही बॉम्बमध्ये सुमारे २० फुटांचे अंतर होते....तर झाली असती जीवित हानीया दोन बॉम्बपैकी प्रेशर बॉम्बच्या स्फोटामुळे साडेतीन फूट रुंद आणि तीन फूट खोल खड्डा पडला आहे. पोलीस पथक त्या ठिकाणाच्या जवळ असते तर मोठी जीवित हानी झाली असती. या स्फोटानंतर त्या परिसरात आणखी बॉम्ब पेरले आहेत का, याची तपासणी करण्यात आली.२८ जुलैपासून सुरू झालेल्या नक्षल शहीद सप्ताहादरम्यान पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे आतापर्यंत हा स्फोट वगळता कोणतीही हिंसक घटना घडवून आणण्यात नक्षलवाद्यांना यश आलेले नाही.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी