बुलडाणा : कर्जाचे हप्ते थकल्याने कंपनीने अँपे जप्त केला. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काकाचा ऑटो चालविण्यासाठी घेतला. मात्र तो ऑटो ही पोलिसांनी हप्ते थकलामुळे जप्त केला. स्वत:च्या अँपेचे कर्ज कसे फेडावे, पोलिसांचे हप्ते कसे द्यावे, या विवंचनेत असलेल्या बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथील अविनाश चव्हाण या अँपे चालकाने बुलडाणा शहर पोलिस स्टेशन परिसरात २३ एप्रिल रोजी सकाळी ११.३0 वाजता विष घेतले. या घटनेमुळे पोलिस स्टेशन परिसरात खळबळ उडाली असून सदर अँपे चालकास गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी ऑटोचालकाची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
पोलीस ठाण्याच्या आवारात ऑटोचालकाने घेतले विष
By admin | Published: June 23, 2016 10:37 PM