शौकत शेख,
डहाणू- रविवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी डहाणू पोलीस ठाण्याला भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व ते स्मार्ट बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली. या पोलीस ठाण्याअंतर्गत डहाणू शहराची ६० हजार लोकसंख्या आहे. यातच डहाणू समुद्र किनारा आणि डहाणू खाडी समाविष्ट असल्यामुळे मनुष्यबळ आवश्यकते पेक्षा कमी पडते त्यातच सी.सी.टी.व्ही कॅमेरे मेंटनंन्स अभावी बंद आहेत. त्यामुळे पोलिसांना कामात अनेक अडचणी येत आहेत, असे पोलीस निरिक्षक डोंबे यांनी सांगितले. त्या सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्त डहाणू येथे राबवलेले स्वच्छता अभियानानिमित्त आल्या होत्या. यावेळी खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भरत राजपूत आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार चिंतामण वनगा यांनीही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.दरम्यान >निधीचे आश्वासनडहाणू पोलीस ठाण्याशी संबंधीत मनुष्यबळ आणि भौतिक सुविधांची कमतरता लक्षात घेता आपल्या माध्यमातून डहाणू पोलीस स्टेशन अंतर्गत सी.सी.टी.व्ही कॅमेरे, कारागृह, व्हॅन, महिला दक्षता गृह आणि रिक्त पदे भरण्यासह त्याचे आदर्श पोलीस ठाण्यात रुपांतर करण्याचा व त्यासाठी आवश्यक तो निधी देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.