शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

हळदी समारंभात पोलिसांचा लाठीहल्ला

By admin | Published: April 21, 2017 3:35 AM

कोपरखैरणेत हळदी समारंभात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेवर पोलिसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली. ग्रामस्थांनी कारवाईला विरोध केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला

नवी मुंबई : कोपरखैरणेत हळदी समारंभात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेवर पोलिसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली. ग्रामस्थांनी कारवाईला विरोध केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात चौघे जखमी झाले. जखमीत एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जखमींना महापालिकेच्या प्रथम संदर्भा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, २0 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोपरखैरणे सेक्टर १९ येथे बुधवारी रात्री कुंदन गणेश म्हात्रे यांच्या घरी हळदी समारंभ होता. त्यासाठी डीजे लावला होता. नियमानुसार रात्री दहा वाजेपर्यंत डीजे वाजविण्याची मुभा आहे. मात्र येथे रात्री उशिरापर्यंत डीजे सुरू होता. सूचना देऊनही डीजे बंद न केल्याने अखेर पोलीस उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी काही पोलीस कर्मचारी व ध्वनिमापक पथकासह आले. त्यांनी डीजेच्या ध्वनीची तीव्रता मोजण्यास सुरुवात केली. त्याला तरुण व काही महिलांनी विरोध केला. त्यामुळे तणाव वाढला. त्यानंतर कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड अधिक कुमक घेऊन आले. जमाव आक्रमक झाल्याने तसेच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी जमावावर सौम्य लाठी हल्ला केला. यासंदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदींसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रशांत खैरे यांची भेट घेऊन ग्रामस्थांवरील गुन्हे परत घ्यावे तसेच लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात हळदी समारंभ होत आहेत. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर आणि वाद्य वाजविले जातात. करावे येथे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या एक हळदी समारंभातील वाद्याच्या तीव्रतेचे ध्वनिमापक यंत्राद्वारे नोंद घेण्यात आली. पोलिसांना विरोध करणाऱ्या जयेश रमेश भोईर, सुमित सुधाकर तांडेल, विशाल निवृत्ती तांडेल व बिपीन महादेव म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर बेलापूर गावात अशाच प्रकारे ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी प्रथमेश बळीराम पाटील याच्यावरही गुन्हा दाखल केला.