- संदीप झिरवाळ, नाशिकराज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बाराशे पोलीस निरीक्षकांनी मदतीचा हात दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांनी तीन लाखांचा निधी ‘नाम’कडे सुपूर्द केला आहे.पोलीस दलातील २०१२ या वर्षातील सत्र क्रमांक १०८ च्या तुकडीच्या अधिकाऱ्यांनी तीन लाख ११ हजार २०२ रुपयांच्या निधी जमा केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. संपूर्ण राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून ग्रुप तयार केले. निधी संकलनासाठी मुंबईतील प्रवीण सुरवाडे यांनी पुढाकार घेतला. व्हॉट्स अॅपवर ‘१०८ सेव्ह फार्मर’ या नावाने १२ ग्रुप तयार करून सुमारे १,२०० पोलीस उपनिरीक्षकांना एकत्र आणले. प्रत्येक अधिकाऱ्याने पाचशे ते पाच हजार रुपयांपर्यंत मदत केली, ती थेट बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर पुणे येथील शिवगंगा प्रतिष्ठान संस्थेच्या मदतीने नाम फाउंडेशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.दु:खाची जाणीव२०१२ च्या बॅचमधील पोलीस उपनिरीक्षकांपैकी अनेक जण शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे.
पोलीस उपनिरीक्षकांची शेतकऱ्यांना मदत
By admin | Published: January 30, 2016 1:41 AM