शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पोलीस ठाण्यात महिला पीएसआयला धमकी

By admin | Published: December 30, 2016 8:57 PM

एका २७ वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षकास पोलीस ठाण्यातच धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - एका २७ वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षकास पोलीस ठाण्यातच धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री हिंगणा पोलीस ठाण्यात घडली. शशिकांत थोटे (३०, रा. हनुमाननगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार फिर्यादी महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती यावले या गुरुवारी रात्री ड्युटीवर हजर होत्या. दरम्यान मारहाण प्रकरणातील आरोपींना पोलीस ठाण्यात घेऊन आले. अधिकारी गुन्हा दाखल करीत असताना आरोपी थोटे हा ठाण्यात पोहोचला. त्याने स्वत:ला राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगत धमकावणे सुरू केले. त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न करीत शांत राहण्याची ताकीद दिली. यावर आरोपीने पीएसआय स्वाती यांच्याशी वाद घातला आणि पाहून घेण्याची धमकी दिली. आरोपीच्या विरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.