पुणे : दाेन वर्षांपूर्वी काेरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर यंदा पाेलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. काेरेगाव भीमा संदर्भातील आक्षेपार्ह 25 टिकटाॅक व्हीडीओवर पाेलिसांकडून कारवाई करत ते डिलीट करण्यात आले आहेत. तर 15 फेसबुक पेज सुद्धा बंद करण्यात आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिली. त्याचबराेबर साेशल मीडियावर आक्षेपार्ह पाेस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पाेलिसांना देण्यात आले आहेत.
1 जानेवारी 2018 राेजी काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर हल्ला झाला हाेता. यावेळी झालेल्या हिंसाचारामध्ये एकाचा मृत्यू झाला हाेता, तर अनेकजण जखमी झाले हाेते. या घटनेचे तीव्र पटसाद देशभरात उमटले हाेते. या घटनेच्या अनुषंगाने संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांच्यावर पुणे ग्रामीण पाेलिसांनी गुन्हे दाखल केले हाेते. तर 31 डिसेंबर 2017 राेजी शनिवारवाड्यावर आयाेजित एल्गार परिषदेमध्ये माओवाद्यांचा सहभाग असल्याच्या आराेपाखाली अनेक विचारवंतांना पुणे शहर पाेलिसांनी अटक केली हाेती. नुकताच पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये बाेलताना पुणे पाेलिसांनी विचावंतांना केलेली अटक चुकीची असून पाेलीस अधिकाऱ्यांच्या चाैकशीची मागणी शरद पवार यांनी केली हाेती.
यंदा काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखाे नागरिक येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून माेठ्याप्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. आक्षेपार्ह असणाऱ्या 25 टिकटाॅक व्हिडीओवर कारवाई करत पाेलिसांनी ते डिलीट केले आहेत. तर 15 फेसबुक पेज बंद करण्यात आले आहेत. 142 कलमानुसार अनेक व्हाॅट्सअप ग्रुपच्या प्रमुखांना देखील पाेलिसांडून नाेटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबराेबर या काळात साेशल मीडियावर आक्षेपार्ह, प्रक्षाेभक लिखाण करणाऱ्यांवर पाेलिसांच्या सायबर सेलच्या मार्फत लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यावर याेग्य ती कडक कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच शिक्रापूर - लाेणीकंद पाेलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावता येणार नाहीत असे पाेलिसांकडून ग्रापपंचायतींना कळविण्यात आले आहे. तसेच असे फ्लेक्स लागल्यास त्या ग्रामपंचायतींनी तातडीने पाेलिसांना कळविण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले आहे. 2 तारखेपर्यंत या गावांमध्ये कुठलेही आक्षेपार्ह फ्लेक्स, फलक लागल्यास पाेलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.