- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - चेंबूरच्या पांजरापोल परिसरात नाकाबंदी सुरु असताना भरधाव वेगात आलेल्या टँकरने पोलीस व्हॅनला जबर धडक दिली.या अपघातात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचा-यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
टँकरने पोलीस व्हॅनला धडक दिली तेव्हा काही पोलीस कर्मचारी व्हॅनच्या पुढे होते. व्हॅनपुढे असेलेले तीन महिला आणि तीन पुरुष शिपाई जखमी झाले आहेत. यामध्ये एक शिपाई गंभीर जखमी आहे. गोवंडी पोलीसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.