शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

पोलिस ५ महिन्यांपासून गृहकर्जाच्या प्रतीक्षेत; आणखी किती ताटकळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 6:37 AM

संकेतस्थळ नाही अपडेट, प्रकरण पोलिस महासंचालक कार्यालयाकडे ऑनलाइनच पाठवावे लागते 

संदीप झिरवाळनाशिक - पोलिस महासंचालक कार्यालयाकडून महाराष्ट्र पोलिस दलाकरिता घरबांधणी किंवा घर खरेदीसाठी अग्रीम मंजूर केला जातो. मात्र, गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पोलिस महासंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर गृहकर्ज प्रणालीवर नवीन अर्ज करता येत नसल्याने राज्यभरातील पोलिस कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज, तसेच घर खरेदीसाठी केलेली प्रकरणे रखडली आहेत.

गृहकर्ज ॲप्लिकेशन बंदचगृहकर्ज प्रकरणासाठी शहरातील पोलिस कर्मचारी पोलिस आयुक्तालय, तर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कर्मचारी पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज करतात. संबंधित कार्यालयातून सदरचे अर्ज प्रकरण मंजुरीसाठी ऑनलाइन पद्धतीने पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविले जातात; मात्र फेब्रुवारी २०२४ पासून पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वेबसाइटवरून गृहकर्ज ॲप्लिकेशन चालत नसल्याने गृहकर्जासाठी सादर केलेले अर्ज पुढे ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यासाठी तांत्रिक बाबींचा अडथळा निर्माण होत आहे. तांत्रिक बाबीमुळे अद्याप कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याने खाकीत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

निवडणुका, भरतीचा फटकापोलिस महासंचालक कार्यालयाकडून गृहकर्ज मिळण्यासाठी कर्मचारी संबंधित कार्यालयात लेखी अर्ज सादर करतात. त्यानंतर कार्यालयीन कर्मचारी सदरचे प्रकरण पोलिस महासंचालक कार्यालयाला ऑनलाइन पद्धतीने पाठवतात. मात्र, तांत्रिक बाबींमुळे पोलिस महासंचालक कार्यालयाला गृहकर्ज अर्ज प्राप्त होत नसल्याने शेकडो प्रकरणे रखडली आहेत. संबंधित विभागाकडून वेबसाइट अपडेट करण्याचे काम सुरू असून, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका, त्यानंतर राज्यभरात सुरू असलेल्या पोलिस भरतीच्या कामामुळे सदर वेबसाइट अपडेट करण्याचे काम रखडले असल्याचे बोलले जात आहे.

पोलिस शिपाई ते अंमलदारांसाठी ६० लाखांपर्यंतची सुविधा 

गृहकर्ज मंजुरीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी अर्ज करूनही सदरचे अर्ज पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पोहोचले नसल्याने पोलिस महासंचालक कार्यालयाकडून गृहकर्ज मंजुरीसाठी आणखी किती काळ वाट बघावी लागणार, असा सवाल पोलिस कर्मचारी करत आहेत.पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पोलिस शिपाई ते पोलिस अंमलदारापर्यंत घर खरेदी, घर बांधणी याकामी अंदाजे ३० ते ६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होते, सदर कर्जाची परतफेड कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून केली जाते. त्यामुळे पोलिस दलातील कर्मचारी पोलिस दलाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अग्रीम माध्यमातून घर खरेदी करण्याला प्राधान्य देतात.

टॅग्स :Policeपोलिस