शहरं
Join us  
Trending Stories
1
शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा
2
Maharashtra Election 2024: काँग्रेस वर्चस्व कायम ठेवणार की, भाजप मुसंडी मारणार?
3
"प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार"; राहुल गांधींनी केलं आवाहन
4
'छावा' नंतर विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, फर्स्ट लूक आऊट
5
लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागावर इस्रायलचा भीषण हल्ला, २० हून अधिक लोकांचा मृत्यू 
6
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
7
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट
8
Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
9
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
10
"संजय राऊतांच्या अंगात आलं अन् सरकार बनलं, पण..."; कदमांचं विधान, राऊतांनी दिलं उत्तर
11
आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?
12
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
13
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
14
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
15
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
16
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
17
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
18
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
19
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
20
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!

पोलिसांना हवी चौघांची कोठडी

By admin | Published: December 03, 2015 12:50 AM

सुरज परमार आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिसांपुढे हजर होणाऱ्या नगरसेवकांचे आर्थिक व्यवहार तपासण्याकरिता त्यांची पोलीस कोठडी मिळविण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

ठाणे : सुरज परमार आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिसांपुढे हजर होणाऱ्या नगरसेवकांचे आर्थिक व्यवहार तपासण्याकरिता त्यांची पोलीस कोठडी मिळविण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. तर दुसरीकडे हे चारही जण व्यावसायिक असल्याने त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट हे त्यांच्या खात्यात आलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशेब पोलिसांना सादर करण्याची तयारी करीत आहेत.परमार प्रकरणात सुसाइड नोटमध्ये या चौघांची नावे लिहून खोडलेली होती. मात्र, पोलिसांनी या चारही जणांच्या बँक अकाउंटचा तपशील काढून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केल्याने उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळले व त्यांना पोलिसांना शरण येण्यास सांगितले.त्यामुळे आता या चारही नगरसेवकांची पोलीस कोठडी मागून रकमांच्या उलाढालीची उकल करून आपली बाजू मजबूत करणे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्याच वेळी राजकारणाबरोबर खासगी व्यवसाय करणाऱ्या या चार नगरसेवकांचे सीए कामाला लागले आहेत. हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला यांची बांधकाम व्यवसायातही ‘गुंतवणूक’ आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देताना सीएचा कस लागणार आहे.चौघांचीही बँक खाती तसेच त्यांचे व्यवहार आणि साक्षीदार यांची तपासणी करण्यासाठी चौघांची पोलीस कोठडी हवी असल्याचे सूत्रांनी सांगितले.यांच्या खात्यात कोणत्या कारणास्तव पैसे आले, ते कुणाकडून आले, याचा अंदाज पोलिसांनी घेतला आहे. मात्र, आता कोठडीत त्यांना बोलते केल्यावर त्याला सबळ पुरावे प्राप्त होतील आणि परमार आत्महत्येचा दावा न्यायालयात सबळपणे उभा करणे पोलिसांना शक्य होईल. सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण आणि पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दिलीप गोरे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून चौघांची चौकशी केली जाणार आहे.नजीब मुल्ला यांच्या बँक खात्यातून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात वळते झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी आणखी चौकशी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ( प्रतिनिधी )