शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

थर्टी फर्स्टसाठी कोल्हापुरात पोलिसांची ‘झाडाझडती’ सुरू

By admin | Published: December 28, 2016 8:14 PM

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल, लॉजची झाडाझडती घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बुधवारी दिले.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 28 - ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल, लॉजची झाडाझडती घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बुधवारी दिले. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजची तपासणी बुधवारपासून तीन दिवस सुरू राहणार आहे. नाकाबंदीसह वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमारेषांवर नाकाबंदीसह वाहनांची कसून तपासणी सुरू ठेवली आहे. पोलीस व उत्पादन शुल्क विभागातर्फे संयुक्त कारवाईची मोहीम सुरू आहे. ‘थर्टी फर्स्ट’दिवशी उत्साही तरुण मद्यप्राशन करून सुसाट वेगाने वाहने चालवीत मोठमोठ्याने ओरडत जात असतात. अशा वेळी अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर काही हॉटेल्समध्ये आॅर्केस्ट्रा व डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्य करीत असताना महिलांची किंवा तरुणींची छेडछाड होऊन जल्लोषाला गालबोट लागू शकते. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बुधवारी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील वाहतूक व्यवस्थेसह सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना देत हॉटेल व रिसॉर्टची झाडाझडती घेण्याचे त्यांनी आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार गोपनीय विभाग तपासणी करून संबंधित मालकांना नोटिसा देत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याची तस्करी होत असते. गोव्याहून देशी-विदेशी मद्याचा साठा जिल्ह्यात आणण्यासाठी छोटे-मोठे व्यावसायिक छुप्या मार्गाने तस्करी करीत आहेत. शहरालगतच्या उपनगरांसह ग्रामीण भागातील गावठी हातभट्ट्यांवर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले. त्यासाठी बुधवारी रात्रीपासून चार दिवस नाकाबंदी सुरू राहणार आहे. 

शंभर वाहनचालकांना दंडशहरात सीपीआर, कावळा नाका चौकांत शहर वाहतूक शाखेने झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबविणाऱ्या शंभर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. रस्त्यांवरील चौकांत चार पट्टे मारलेले आहेत. हा मार्ग पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आहे. वाहनधारक सिग्नलला थांबताना याच पट्ट्यावर गाडी थांबवून नियमांचे उल्लंघन करतात. अशा वाहनधारकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड भरून घेण्यात आला. वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.