कोल्हापूर : मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यापक धोरण आखण्यात येईल. धोरण निश्चितीसाठी समिती स्थापन केली जाईल. त्यामध्ये ‘फेस्कॉम’च्या सदस्यांना घेऊ, अशी ग्वाही कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिली.कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्राचार्य य. ना. कदम यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘वयोश्रेष्ठ सन्मान राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार सोहळा झाला. पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी मी आमदार असतानाही प्रयत्न केले; आता आपले सरकार आहे. मार्च महिन्यातील अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांसाठी सविस्तर धोरण तयार केले जाईल. त्यासाठी समिती तयार करण्यात येऊन त्यावर ‘फेस्कॉम’च्या सदस्यांना घेतले जाईल. (प्रतिनिधी)
‘ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण ठरविणार’
By admin | Published: November 16, 2015 3:11 AM