मुंबई : फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास जशाच तसे उत्तर मिळेल, असा इशारा देणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावरच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना-भाजपा आणि मनसेने स्थायी समितीच्या बैठकीत केली़ पालिकेचा अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्यास निरुपमच त्यासाठी जबाबदार असतील, असा नाराजीचा सूर सत्ताधाऱ्यांनी लावला़ त्यामुळे फेरीवाल्यांवरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे़फेरीवाल्यांची कड घेऊन मंगळवारी पालिका मुख्यालयात आलेले निरुपम यांची आयुक्त अजय मेहता यांच्याबरोबर वादावादी झाली होती़ त्यामुळे यापुढे फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांना मारहाण करू, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला होता़ निरुपम यांनी फेरीवाल्यांना चेतवल्यास त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावी, अशी सूचना भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली़बेकायदा फेरीवाल्यांविरोधात शिवसेना-भाजपा आणि मनसेने एकत्रित आवाज उठवित कारवाई सुरूच ठेवण्याची मागणी केली़ मात्र फेरीवाल्यांसाठी तयार केलेल्या शहर नियोजन समितीने घोळ घातला आहे़ हा गोंधळ निस्तरून राष्ट्रीय धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात यावे़ फेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र अमलात आणल्यानंतर असा वाद निर्माण होणार नाही, असे मत सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)फेरीवाल्यांची आकडेवारीअधिकृत फेरीवाले : १५,१५९बेकायदा फेरीवाले : २.५ लाखमहिनाभरात कारवाई : १६,000 अर्जांचे वाटप : १़२८लाखफेरीवाल्यांकडून अर्ज : ९९ हजारअधिकृत स्टॉल्स मार्किंग : २३,९५०
फेरीवाल्यांवरून राजकीय वादाचा भडका
By admin | Published: July 16, 2015 1:40 AM