शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

राजकीय घराणेशाही

By admin | Published: February 07, 2017 11:30 PM

कोल्हापुरातील चित्र : प्रस्थापितांचे सतरा वारसदार मैदानात

विश्वास पाटील-- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद या वेळेला खुले झाल्याने प्रत्येक नेत्याला आपल्या वारसाला तिथे संधी देण्याची घाई झाली आहे. त्यामुळे घराणेशाहीला ऊत आला आहे. या जिल्ह्यात तब्बल सतरा वारसदार आपले भविष्य आजमावत आहेत. त्यामध्ये विद्यमान आमदार व खासदारांचे तिघे जवळचे नातलग आहेत.निवडणूक कोणतेही असो त्यातील घराणेशाही ही आता मतदारांच्यासुद्धा अंगवळणी पडू लागली आहे. किंबहुना मतदारांकडूनच ती जोपासली जात आहे. कोल्हापुरात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील हे आपला मुलगा राहुल याला उमेदवारी द्यायला तयार नव्हते परंतु त्या मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल आठ तास त्यांना रोखून धरले. राहुल पाटील यांला उमेदवारी दिल्याशिवाय अन्य मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारांनी ए बी फॉर्म स्वीकारले नाहीत. शेवटी लोकांच्या दबावापुढे नमते घेऊन मुलास रिंगणात उतरविण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.लोकसभा व विधानसभेला प्रस्थापित कुटुंबातील उमेदवारांना संधी मिळते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीला तरी किमान पक्षासाठी व नेत्यांसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जावी, अशी अपेक्षा असते; परंतु तसे घडताना दिसत नाही. कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता या देखील नवे आर्थिक व राजकीय सत्ताकेंद्र ठरल्या आहेत. तिथे जाऊन जशी विकासकामे करता येतात तशी अनेकांची कोंडी करता येते. ग्रामीण राजकारणावर वर्चस्व मिळविता येते. त्यासाठी मग हे पद आपल्याच गोतावळ््यात राहावे, असे नेत्यांना वाटत आहे.कोल्हापुरात भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका रिंगणात आहेत. दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा नातू वीरेंद्र शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार गोविंदराव कलिकते यांची सून गेल्या निवडणुकीत रिंगणात होती, आता त्यांचा मुलगाच संजय मैदानात आहे म्हणजे घराणेशाही जोपासण्यात सगळेच डावे-उजवे पक्ष हिरीरीने पुढे आहेत शिवाय ही घराणेशाही कोल्हापूरपासून चेन्नई ते उत्तर प्रदेशपर्यंत सगळीकडेच आहे.यासंदर्भात राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांना विचारले असता ते म्हणाले,‘राजकीय नेतृत्वाच्या वारसदारांना संधी दिली जावी, अशी मानसिकता आता मतदारांची आणि राजकीय पक्षांचीही होत आहे. त्यांच्याकडे आर्थिक सामर्थ्य, राजकीय वर्चस्व आणि यंत्रणा राबविण्याची ताकद असते. हे सगळे वारसाला अलगदपणे मिळते. ही घराणेशाही सर्व पक्षांत दिसते म्हणून तर जयललितांशी कोणताही संबंध नसताना लोकशाही संकेत पायदळी तुडवून आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी शशिकला यांची निवड होत आहे. नेत्यांच्या वारसदारांना त्यांच्याकडे क्षमता असेल तर का संधी मिळू नये, अशीही विचारणा केली जाते; परंतु समान संधीच्या तत्त्वाचा विचार केल्यास हे वारसदार शर्यत सुरू होण्यापूर्वीच पुढे असतात. पद्मश्री विखे-पाटील कुटुंबापासून ते अनेक ठिकाणी असे अनुभवण्यास येते की तिथे मागच्या पिढीच्या तुलनेत पुढील पिढीतील नेतृत्व तितकेसे प्रभावशाली नाही परंतु तरीही त्यांना वारसा म्हणून ही संधी मिळाली आहे.सातऱ्यातही वारसदारचसचिन जवळकोटे ल्ल सातारासातारा जिल्ह्यात कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुडाळ (ता. जावळी) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी तरडगाव (ता.फलटण) गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वहिनी शिवांजलीराजे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही सोमवारी जिल्हा परिषदेच्या साखरवाडी (ता.फलटण)गटातून अर्ज दाखल केला. विधान परिषदेचे सदस्य व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रताप आनंदराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सुपने (ता.कराड) गटातून उमेदवारी अर्ज सोमवारी शक्तिप्रदर्शनासह दाखल केला. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अ‍ॅड. उदय पाटील यांनी येळगाव (ता.कराड) जिल्हा परिषद मतदार संघातून विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. ते प्रथमच एका सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत.