राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 07:56 AM2024-10-05T07:56:03+5:302024-10-05T07:57:25+5:30

मोदी करणार ३२,८०० कोटींच्या नागरी प्रकल्पांचे उद्घाटन, राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

Political guns will be fired in the state today; PM Narendra Modi in Washim-Thane and Rahul Gandhi in Kolhapur | राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. २३,३०० कोटींच्या कृषी उपक्रमांचा प्रारंभ आणि ३२,८०० कोटींच्या नागरी प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होईल.

मोदी सकाळी ११.१५ ला वाशिम जिल्ह्यातील पोहरादेखील येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील. पोहरादेवी येथे २३३०० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता वितरित केला जाणार 

अनेक प्रकल्पांची होणार पायाभरणी
ठाणे येथे दुपारी ४ वाजता ३२,८०० कोटींच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो ३ टप्पा १ याप्रकल्पाचे आाणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. नैना प्रकल्पाच्या टप्पा दोनची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल.

शेतकऱ्यांना मिळणार निधी
९.४ कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे १,९२० कोटी रुपयांचे ७५०० हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच, ९२०० शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील.

बंजारा संग्रहालयाचे उद्घाटन :  बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या बंजारा विरासत संग्रहालयाचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

 राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण
कोल्हापूर : लोकसभेचे विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांचा शुक्रवारचा नियोजित कोल्हापूर दौरा विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अचानक रद्द झाला. मात्र, राहुल गांधी हे आज शनिवारी सकाळी कोल्हापुरात येणार असून, त्यांच्या हस्ते सकाळी १० वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांचा हा दौरा महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 

शाहू समाधी स्थळी करणार अभिवादन
राहुल गांधी हे शुक्रवारपासून दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर होते. विशेष विमानाने सायंकाळी विमानतळावर ६:२० वाजता आगमन होणार होते. मात्र, विमानात तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा अचानक रद्द झाला. शनिवार सकाळी ८:३० वाजता राहुल गांधी हे कोल्हापुरात येणार असून, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील, असे आ. सतेज पाटील यांनी सांगितले. दुपारी १:३० वाजता शाहू समाधी स्थळी अभिवादन व हॉटेल सयाजी येथे संविधान सन्मान संमेलन, असे नियोजित कार्यक्रम वेळेनुसार पार पडतील, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

Web Title: Political guns will be fired in the state today; PM Narendra Modi in Washim-Thane and Rahul Gandhi in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.