मुंबई : शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्याविरोधात आयकर विभागाच्या कार्यवाहीने महाविकास आघाडीतील हालचाली वाढल्या आहेत. जाधव यांनी विधानसभा निवडणुकांवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका ठेवत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली. जाधव प्रकरण पुढे येताच बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केल्याचे समजते. तर, दुसरीकडे यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात आम्ही योग्य माहिती दिली आहे. संबंधित यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे. बदनामीच्या उद्देशाने खोटे आरोप केले जात असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
यामिनी जाधव प्रकरणी राजकीय हालचाली वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:19 AM